सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याशी संबंधित एक विचित्र घटना व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका नवऱ्याने कुत्रा जास्त जवळ येतो म्हणून त्याच्याबरोबर असं काही केलं आहे. जे समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय ही घटना एका महिलेने Reddit वर शेअर केली आहे. ज्यामध्ये ट्रीपवरुन घरी परतल्यावर तिचा कुत्रा अचानक गायब झाल्याचं तिने सांगितलं आहे. महिलेने सांगितलं की, मी काही दिवसांपुर्वी माझ्या मुलीबरोबर ट्रीपला गेले होते. जेव्हा मी परत आले तेव्हा माझा ‘एली’ नावाचा कुत्रा घरी नव्हता आणि जेव्हा मी माझ्या पतीला याबद्दल विचारले तेव्हा त्याने, ‘उद्यानात माझ्या हातातील पट्टा सोडून एली पळून गेला’ असं विचित्र उत्तर दिले.

महिलेने पुढे लिहिलं की, आमचा कुत्रा लहान आहे तो जवळपास १३ वर्षांचा आहे आणि तो आमच्यापासून पळून जाण्याचे काम करू शकत नाही. त्यामुळे मला नवऱ्यावर संशय आला. तसेच जेव्हा आम्ही परत आलो, तेव्हा माझ्या नवऱ्याला एली हरवल्याचं कसलेही दु:ख झाले नव्हते. त्यामुळे माझ्या संशय बळावला.

हेही वाचा- हवालदाराला दारु पाजून कैदी फरार, चोरी प्रकरणी केली होती अटक, न्यायालयात नेत असताना घडली धक्कादायक घटना

नवरा कुत्र्यावर होता नाराज –

महिलेने सांगितलं की, कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून, माझ्या पतीने घरून काम करायला सुरुवात केली होती. यावेळी मी एलीची खूप काळजी घेते, तसेच तो त्याच्या आणि माझ्या मांडीवर बसतो हे त्याला आवडत नव्हते, त्यामुळे तो एलीवर नाराज होता.

काही दिवसांनंतर आम्हाला एली सापडल्याचा शेजारच्या राज्यातील प्राणी बचाव पथकाचा फोन आला. मी माझ्या पतीला सांगितले यावर तो फक्त ‘हे खूप छान झालं, मी खूप आनंदी आहे’, असं म्हटला, पण त्याला या गोष्टीचा काही विशेष आनंद झाला नाही. यावर मी, “एली इतक्या लांब कसा गेला असेल?” असं विचारलं असता, कोणीतरी चोरले असेल आणि नंतर त्याला लांब सोडले असेल असं नवऱ्याने उत्तर दिल्याचंही महिलेने सांगितलं.

हेही पाहा- फेमस होण्यासाठी स्वच्छतेचं नाटक! आधी कचरा गोळा केला आणि कॅमेरा बंद होताच…, इन्फ्लुएन्सरचा Video पाहताच नेटकरी संतापले

सीसीटीव्ही तपासताच महिलेला बसला धक्का –

दरम्यान, महिलेने सांगितले की, तिचा नवरा मित्रांबरोबर बाहेर गेला तेव्हा, ज्या काळात मी घरी नव्हते त्या दिवसांतील व्हिडीओ त्याच्या डॅशकॅमवरून कॉपी केले. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याने एलीला राज्याबाहेर नेऊन सोडलं होतं. शिवाय कारच्या मागे एली धावतानाही दिसत आहे. मात्र काही अंतरावर गेल्यावर एली गायब झाली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला सर्व काही समजले आणि मला माझ्या नवऱ्याचा राग आला. मात्र, डॅश कॅम तपासल्याबद्दल तो माझ्यावरच रागावला, असंही महिलेने सांगितलं. ही घटना व्हायरल होताच अनेकांनी महिलेच्या नवऱ्यावर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने, “कोणी प्राण्यांबद्दल इतके क्रूर कसे वागू शकते” असं लिहिलं आहे, तर दुसर्‍याने, “अशा नवऱ्याला सोडून द्या” असं म्हटलं आहे.