झारखंडमधील रांची येथील एका धक्कादायक घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे, एका व्यक्तीने चौथ्यांदा लग्न करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला त्याच्या पहिल्या बायकोने कोर्टाच्या आवारातच बेदम मारहाण केली आहे. एवढेच नव्हे तर कोर्टात उपस्थित असलेल्या इतर लोकांनीही लग्न करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला धु धु धुतलं आहे. हे प्रकरण रांची सिव्हिल कोर्ट कॉम्प्लेक्सशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचे वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

स्वत: वकील असलेला एक व्यक्ती चौथ्यांदा लग्न करण्यासाठी कोर्टात आल्याचे सांगण्यात येत आहे. वकील आणि तो चौथं लग्न करणार असणारी महिला कोर्टात पोहोचली असता वकिलाच्या पहिल्या बायकोने बेदम मारहाण केली. पत्नीशिवाय इतर वकिलांनीही आरोपी व्यक्तीला बेदम मारहाण केली. वकिलाच्या बायकोचा आरोप आहे की, तिचा नवरा तिची फसवणूक चौथ्यांदा लग्न करणार होता. याची माहिती तिला समजताच तिने कोर्टात जाऊन पतीला मारहाण केली.

UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Lock in period of marriage court verdict chatura article
विवाहाचा लॉक-इन पिरीयड
couple hit each other
VIDEO : ‘नवरा-बायकोच्या नात्यावरचा विश्वास उडवणारी घटना’, भररस्त्यात एकमेकांना दिला बेदम चोप; गळा आवळून रस्त्यावर आपटल अन्…
pune crime news
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित, विवाहास नकार देऊन पाच लाख, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
Crime News
Crime News : पत्नीच्या विश्वासघाताने पती शॉक! आधी १० लाखांना किडनी विकायला तयार केलं, पैसे मिळताच पेंटरबरोबर झाली फरार
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
Woman to High Court for seeking abortion due to marital dispute
वैवाहिक कलहामुळे महिलेची गर्भपाताच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव

हेही वाचा- हनिमूनला निघालेली पत्नी वॉशरुमला गेली ती परतलीच नाही, नवऱ्याच्या तक्रारीनंतर १००० किमी दूर सापडली, प्रकरण वाचून थक्कच व्हाल

वकील आणि त्यांची पत्नी यांच्यातील हायव्होल्टेज ड्रामा न्यायालयाच्या आवारात बराच वेळ सुरू होता. पत्नी-पत्नीमध्ये सुरू असलेला हा वाद पाहण्यासाठी तिथे लोकांची गर्दी झाली होती. पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केल्यावर उपस्थित लोकांनीही वकिलाला मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. वकिलाच्या दोन पत्नींनी आरोप केला की, त्यांचा पती त्यांची फसवणूक करुन चौथ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होता, ज्याची त्यांना माहिती मिळाली. यानंतर पहिल्या बायकोने थेट न्यायालयात जाऊन पतीला मारहाण केली. आता या प्रकरणाची रांचीच्या दिवाणी न्यायालयात जोरदार चर्चा होत आहे.

पत्नीने पतीला मारहाण केल्यानंतर नेटकऱ्यानी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. आरती ठाकूर नावाच्या युजरने लिहिले की, “शाब्बास, हे फसवणूक करणाऱ्याबरोबर असेच झाले पाहिजे.” तर दुसऱ्या यूजरने लिहिले, “दोसरं नव्हे तर चौथं लग्न करणार होता, पत्नीने तिचे कर्तव्य चांगले पार पाडले.”

Story img Loader