प्रत्येक तरुणाचे कॉलेज संपलं की काहीतरी उद्योग करुन किंवा चांगली नोकरी करुन आयुष्यात यशस्वी होण्याचं स्वप्न असतं. अनेकजण यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात, पण प्रत्येकाच्या प्रयत्ननांना त्यांच्या मनासारखं यश मिळतेच असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका तरुणाची चर्चा सुरु आहे, जो २३ व्या वर्षीच करोडपती बनला आहे. शिवाय त्याने आपण ठरविलेल्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचंही सांगितलं आहे.

शिवाय २३ व्या वर्षी करोडपती बनलेल्या तरुणाने त्याच्या यशामागे असणारी तीन कारणेदेखील सांगितली आहेत. यामध्ये त्याने पहिलं कारण सांगितलं ते म्हणजे, मित्रांपासून लांब राहणे, दुसरं कुटुंबापासून दूर राहणे आणि तिसरं जगभर फिरणे. हायके एजन्सी ही पीआर कंपनी चालवणाऱ्या ल्यूक लिंत्जचे म्हणतो की, “मी हायस्कूल आणि ग्रॅज्युएशननंतर खूप लोकप्रिय होतो, पण मला मित्रांचे वाढदिवस, प्रमोशन आणि लग्नसोहळे साजरे करण्यासाठी बोलावण्यात येत होते, ज्यामुळे माझे लक्ष विचलित व्हायचं.”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

हेही वाचा- “अंकिता, एक्स-बॉयफ्रेंडसाठी फूड ऑर्डर करु नका…,” तरुणाने पैसे द्यायला नकार देताच ‘Zomato’ने केलेलं अनोखं ट्विट व्हायरल

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, आठवड्याचे सातही दिवस काम करणारा ल्यूक लिंत्ज म्हणतो, “लोकांचे खूप मित्र असतात. या वयात मित्र नसल्याची मला चिंता नाही.” लिंत्ज त्याच्या दोन भावांच्या, जॉर्डन आणि जॅक्सनच्या जवळ राहतो. तो त्यांच्या मदतीने आपली कंपनी चालवतो आणि त्याचा काही मोकळा वेळ संभाषणासाठी वापरतो. तो म्हणतो की, कामानंतर, मला जो काही वेळ मिळतो, तो मी माझ्या भावांशी कामाशी संबंधित चर्चा करण्यात घालवतो.

नातेवाईकांपासून लांब –

नातेवाइकांनीही या तीन भावांपासून अंतर ठेवले आहे. लिंत्ज सांगतो, अनेक लोकांकडे त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जी आवश्यक गोष्ट असते तिच नसते. तसेच आपल्या वयातील लोक आळशी असल्याची टीकाही त्यांने केली आहे. शिवाय अनेक लोक आपल्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचंही तो म्हणाला. परंतु तरीही तो त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोकांपासून दूर राहतो. शिवाय काही लोकांची मैत्री तुम्हाला मागे खेचतात आणि वेळही वाया घालवतात, असंही लिंत्ज यांने म्हटलं आहे. लिंत्ज म्हणतो की त्याची एक प्रेयसी आहे, तो तिला वेळ देतो. तुमची इच्छा असेल तर तुम्हीही मित्र बनवू शकता, पण आयुष्यभर टिकणारी मैत्रीवर तो विश्वास ठेवत नाही, अशी मैत्री म्हणजे वेळेचा अपव्यय असल्याचं लिंत्ज म्हणाला.

Story img Loader