सोशल मीडीयावर सध्या एका चिमुकला आपल्या आईसोबत अभ्यास करत असताना रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र, या लहान मुलाच्या आईवर नाराज झाले आहेत शिवाय ते टीका देखाल करत आहेत. तसंच या महिलेची लहान मुलाला शिकवण्याची पद्धत अयोग्य असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला 1-10 पर्यंतचे आकडे इंग्रजीमध्ये वहीत लिहिताना दिसतं आहे. मात्र, हे आकडे लिहिताना तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे तर त्याला त्याच्या आईची खूप भिती वाटत असल्याचं या व्हिडीओत स्पष्टपणे जाणवत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ dwivedi.mini नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये मिनी नावाची महिलेला तिच्या लहान मुलाचा अभ्यास घेताना दाखवलं आहे.

हेही पाहा- निसर्गाचं ऑप्टिकल इल्यूजन पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; या जादूई काडीचा Video होतोय Viral

मात्र, या व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या आईला प्रचंड घाबरलेला दिसतं आहे. शिवाय 1-10 पर्यंतचे आकडे लिहिताना तो सतत रडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. तर या लहान मुलाला आपल्याकडून आकडे लिहिताना काही चूक झाली तर आई मारहाण करेल याची भीती वाटत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये तो सतत रडत असल्याने त्याची आई त्याला का रडतो आहेस? असं विचारते त्यावेळी हा चिमुकला आपल्या आईला घाबरतं मिठी मारतं तिचं चुंबन घेताना दिसतं आहे. त्यामुळे या महिलेने व्हिडीओ करण्याआधी आपल्या मुलाला मारहाण केली असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर ‘तुमची शिकवण्याची पद्धत चुकीची असून मुलावर जास्त दबाव आणू नका, त्याला आता खेळू द्या, वेळ आल्यावर तो अभ्यास करेल’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आत्तापर्यंत ३ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending toddler cries while studying with his mother netizens were outraged after seeing the video jap
Show comments