Viral video: शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते. शाळेत तास, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हारवत चालले आहे. परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात.त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ही मुलं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. ज्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना दिसतात, तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलगाही भन्नाट गाणं गात त्याची हीच कला सादर करताना दिसत आहे.
ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत, अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे. परंतू एका शिक्षकानं या विद्यार्थामधील हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं. सोशल मीडियावरदेखील या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. ज्याने अख्ख्या महाराष्ट्राल वेड लावलं आहे. हा व्हिडीओ एका शाळकरी मुलाचा आहे. ज्याचं गाणं तुमच्या कानावर पडताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. हा मुलगा आपल्या वर्गात गाणं गताना दिसत आहे. हा मुलगा लावणी गात आहे. त्याच्या आवाजात अशी काही जादू आहे की तुम्ही त्याचं गाणं संपूर्ण ऐकण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही
नथीचा नखरा नऊवारी साडी पदर डोक्यावर हे मराठमोळं गाणं अगदी तालासुरात या चिमुकल्यानं गायलं आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात हे असस्ल टॅलेंट फक्त जिल्हा परिषद शाळेतच पाहायला मिळणार. या मुलानं जे गायलं त्याला तोड नाही. हा जबरदस्त व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल खरंच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या या मुलाच्या टॅलेंटला मानावं लागेल.
पाहा व्हिडीओ
शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. हल्ली सोशल मीडियावर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात.