जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येत आहे. अनेक शहरांमध्ये ख्रिसमसनिमित्त रोषणाईने करण्यात आली आहे. लोक ख्रिसमससाठी भेटवस्तू खरेदी करताना दिसत आहेत. ख्रिसमसच्या शुभेच्छा प्रत्येकजण आपापल्या परीने एकमेकांना देत आहे. त्यामध्ये कोणी सोशल मीडियाद्वारे मेसेज करुन तर कोणी लोकांना प्रत्यक्ष भेटून देत आहेत. अशातच आता अमीरात एअरलाइन्सने जगभरातील नागरिकांना ख्रिसमसच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा पाहून लोकांनी अमीरात एअरलाइन्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही पाहा- Christmas 2022 : ख्रिसमस कार्डवर पठ्ठ्याने छापलं असं काही ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी अमीरात एअरलाइन्सने एक रोमांचक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तो तुम्हालाही आवडेल यात शंका नाही. अमीरात एअरलाइन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धावपट्टीवर एका विमानाला हरणांचा कळप आकाशात घेऊन जाताना दिसतं आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच भावला आहे.
हेही पाहा- Video: तुमच्या नावाची डुबकी…, थंडीत आंघोळ करावीशी वाटत नसेल तर ‘या’ पठ्ठ्याची ऑफर बघा
या व्हिडिओमध्ये एकाच वेळी अनेक हरणं धावपट्टीवरुन विमानाला आकाशात घेऊन जात असल्याचं दिसतं आहे. ही सर्व हरणं हळूहळू त्यांचा वेग वाढवतात आणि विमानाला घेऊन आकाशात उडताना दिसतं आहेत. या विमानावर एक मोठी सांताची टोपीही लावण्यात आली आहे. या मनोरंजक व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “कॅप्टन क्लॉज, टेक-ऑफसाठी विनंती करत आहोत, अमीरातकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा.” असं लिहिण्यात आलं आहे.
रोमांचक व्हिडीओ व्हायरल –
नुकताच शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत तर ४ मिलियनहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून व्हिडीओचे कमेंट बॉक्स हार्टच्या इमोजींनी भरलं आहे. हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे, “खूप गोंडस, खूप सुंदर!’ या प्रकारे शुभेच्छा देण्याची संकल्पना राबवणाऱ्या सर्व लोकांचे अभिनंदन” आणखी एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, “अमीरात एअरलाइन्स नेहमीच काहीतरी वेगळे करते आणि ते खूप अद्भुत असते.”