जंगलातील वन्यजीवांचे फोटो आणि व्हिडीओ शूट काम खूप ग्लॅमरस वाटत असलं तरी ते तितकचं धोक्याचं असतं. कारण जंगलातील प्राणी, पक्षी किंवा सरपटणारे प्राणी यांचे लोकांना आवडतील असे फोटो, व्हिडूओ शूट करण्यासाठी फोटोग्राफर्सना योग्य जागा शोधावी लागते. तर अचूक शॉट कॅप्चर करण्यासाठी या फोटोग्राफर्सना खूप भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागतं. कधी दलदलींमध्ये तर कधी भर पावसामध्ये त्यांना तासंतास घालवावे लागतात.
हेही पाहा- म्हशीसमोर एक्सलेटर वाढवली आणि करुन घेतली स्वत:ची फजिती; Video पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे फोटोग्राफर्सचा त्रास काही प्रमाणात कमी झाला असला तरी वन्यजीवांकडून असणारा धोका टळला नाही. याचेच एक उदाहरण समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका मगरीचे ड्रोनद्वारे व्हिडीओशूटींग सुरु असताना तिने असं काही केलं आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
हेही पाहा- Video: चिमुकल्याच्या डोळ्यात अश्रूच्या धारा तरीही आई घेतेय शाळा; शिकवण्याची पद्धत पाहून नेटकरी भडकले
ट्विटरवर @HowThingsWork_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये नदीमध्ये पोहणाऱ्या मगरीच्या जवळून एक ड्रोन उडताना दिसत आहे. थोड्या वेळाने ती एक मगर पाण्याबाहेर डोकावत ड्रोनकडे बघताना दिसत आहे. मगरीला ड्रोन दिसल्याचं समजताच ड्रोन पायलटने तो ड्रोन वर घेण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच काही क्षणात मगर ड्रोनवर झडप घालून त्याला आपल्या जबड्यात ओढून घेते. हा व्हिडीओ पाहताना अंगावर शहारा येत आहे.
हा व्हिडीओ आत्तापर्यंत एक मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. यामध्ये काहींनी ड्रोनच्या आवाजाने मगर कशी चिडली हे लिहिले आहे, तर काहींनी ड्रोन पायलटने ही व्हिडीओ शूट करत असताना सुरक्षित अंतर कसं राखायला हवे होते याबाबतच्या कमेंट केल्या आहेत.