मासा हा सर्वात चंचल प्राणी आहे त्यामुळे त्याला पकडणं अनेकांना अवघड जातं. शिवाय मासे पकडण्याचं काम अनेकांना कंटाळवाणं वाटतं. बदलत्या तंत्रज्ञामामुळे मासे पकडण्यासाठी विविध उपकरणं उपलब्ध झाली आहेत. ज्यामुळे मासे पकडणं सोप्प झालं आहे. मात्र, अनेक देशांमध्ये आजही पारंपारिक पद्धतींने मासे पकडले जातात. त्यासाठी काही लोकं जाळ्याचा वापर करतात तर काही गळ वापरतात. हौशी लोक सु्ट्टीच्या दिवशी टाइमपास म्हणून मासेमारी करायला जातात. अशातच आता एका व्यक्तीने केलेल्या मासेमारीचा असा व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून तुमचा मासेमारीचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.
हेही वाचा- नॅनो कारपासून बनवलं हेलिकॉप्टर: पेट्रोलचे महाग दर विसरा; हवा पाण्यावर गाडी बनवणार हा पठ्ठ्या
कारण, या व्हिडीओतील व्यक्तीने गळाचा किंवा जाळ्याचा वापर न करता चक्क हातांनी भलामोठा मासा पकडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वयस्कर व्यक्ती लहान माशाचं आमिष दाखवत मोठ्या माशाला पकडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून मासेमारी करणं एवढे सोप्प असेल आम्हाला माहितं नव्हतं असं नेटकरी म्हणत आहेत.
या आजोबांनी अनोख्या पद्धतीने पकडलेल्या माशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतं आहे. तर हा व्हिडिओ Lunkerville नावाच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, एक वयस्कर व्यक्ती उतारावर पडून एक लहान मासा पाण्यात सोडताना दिसत आहे. तो लहान मासा खाण्यासाठी एक मोठा मासा पटकन येतो आणि तिथेच तो पकडला जातो.
रिकाम्या हाताने पकडला मासा –
व्हिडिओमध्ये, एक मोठा मासा त्या लहान माशाची शिकार करण्यासाठी येतो. मात्र, लहान माशाचा वापर करुन मोठ्या माशाची शिकार करण्यासाठी पाण्याबाहेर असणारी व्यक्ती मोठा मासा लहान माशाला गिळायला येताच त्याचे तोंड पकडून पाण्याबाहेर काढतो. या व्यक्तीने माशाला इतक्या वेगाने पकडले आहे की अनेक लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आजोबांच्या हुशारीचं कौतुक केलं जातं आहे. शिवाय कोणत्याही गोष्टीचं आमिष हे संकटात ढकलतं अशा कमेंटदेखील नेटकरी करत आहेत.