रील बनविण्यासाठी हल्ली तरुण पिढी कुठल्या टोकाला जाईल ते सांगता येत नाही. लोक या नादात आपला जीव धोक्यात घालतात. काही वेळा लोकांचा यात मृत्यू होतो. सोशल मीडियावर अशा अनेक घटनांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात; त्यामुळे खरंच खूप भयानक असं काहीतरी पाहिल्याचा अनुभव येतो. सध्या असाच एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की, लोक असं का वागतात?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती स्कुटी घेऊन समुद्रात जातेय. यावेळी त्या व्यक्तीनं डोक्यात हेल्मेट घातल्याचं दिसत आहे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे रील बनविण्यासाठी तो समुद्राच्या पाण्यात जातो. यावेळी समुद्रातून धोकादायक लाटा उसळताना दिसत आहेत. मात्र, तो स्कुटी चालवत पुढे जात राहतो.

समुद्राच्या त्या उंच लाटांमध्ये तरुण वाहून जाण्याची दाट शक्यता होती; मात्र तरीही तरुण जीवाची पर्वा न करता, स्कुटीवरून समुद्रात मस्त फिरतो. उंच लाटा पाहिल्यावर तरी तो पुन्हा मागे फिरेल, असे वाटते; पण तो कसलीही भीती न बाळगता, लाटांमध्ये स्कुटी चालवत राहतो. यावेळी तो एकदा स्कुटी पाण्यात सोडून देतो; पण पुन्हा नंतर उचलतो. हा व्हिडीओ पाहताना तुम्हालाही भीती वाटेल.

बर्थ डे पार्टी असो वा विकेंड पार्टी घरच्या घरी बनवा ‘चिकन कोफ्ता पिझ्झा’; ही घ्या सोपी रेसिपी

यावेळी लाटांचा जोर वाढल्याचं पाहून, तो तरुण समुद्रातून बाहेर येतो. सुदैवानं त्याला कोणतीही इजा झाली नाही आणि तो सुखरूप बाहेर पडला. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे ते सध्या तरी कळू शकलेलं नाही. त्याशिवाय त्या व्यक्तीनं असं का केलं हेदेखील कळू शकलेलं नाही.

हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर कमेंट्स शेअर केल्या आहेत.