सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकीत होतो. तर काही अशा घटनांचे असतात जे पाहिल्यानंतर आपलं मनोरंजन होतं. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो जेवढा मजेशीर तेवढाच थक्क करणारा आहे.

हो कारण, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला धान्याच्या गोदामात काम करणारे मजूर काही तांदळाची पोती घेऊन येत असल्याचं दिसत आहे. या तांदळाची गुणवत्ता ही महिला इतक्या वेगाने तपासत आहे की, ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत. महिलेच्या काम करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा- अशी नजर हवी! फेसबुकच्या मदतीने ४ हजारांचे केले ८२ लाख, जुन्या खुर्चीमुळे कसा झाला ‘तो’ लखपती? जाणून घ्या

व्हिडीओमध्ये एका धान्याच्या गोदामात काही पोती ठेवल्याचं दिसत आहे. यावेळी एक महिला धारदार शस्त्र जे पोत्यामधील धान्य बाहेर काढण्यासाठी वापरलं जातं (टोच्या) ते हातात घेऊन प्रत्येक पोत्यामधील तांदूळ बाहेर काढून तपासत आहे. यावेळी अनेक मजूर पोती घेऊन येताना दिसत आहेत. मजूरांच्या खांद्यावर असणाऱ्या तांदळाच्या पोत्यांमध्ये ही महिला धारधार शस्त्र घालताना दिसत आहे. शिवाय तिचे काम करण्याचे स्पीड पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. अनेकांनी ही महिला सुपरफास्ट ट्रेनप्रमाणे पटपट पोती तपासत आहे, असं म्हटलं आहे.

हेही पाहा- MS Dhoni च्या सख्ख्या भावाचे ‘ते’ फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न; म्हणाले, “म्हणूनच भावाची ओळख…”

महिलेचा हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांना आवडला आहे. कारण सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. techniiverse नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास २५ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकजण व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं आहे, “चुकून मजूरांचा डोळा फोडशील” तर दुसऱ्याने “मजूरांच्या डोक्यात नको मारु दीदी” असं म्हटलं आहे.एका नेटकऱ्याने वेग चांगला आहे, यालाच धंदा म्हणतात असं लिहिलं आहे.