आपण प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी जात असताना आपल्या आजूबाजूला अनेक गरजू लोक दिसत असतात, आपल्यापैकी अनेकजण त्यांना मदतही करतात. पण प्रत्येकजण गरजू लोकांना मदत करतोच असं नाही. शिवाय असे अनेक लोक असतात जे कसलाही भेदभाव न करता एखाद्या गरजू व्यक्तीला मनापासून शक्य ती सर्व मदत करतात. सध्या असाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकडज माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रस्ता ओलांडणाऱ्या दिव्यांग मुलीची अशाप्रकारे मदत करत आहे, ते पाहून तुम्ही देखील त्या महिलेचं कौतुक कराल यात शंका नाही. खरं तर, सध्याच्या या धावपळीच्या जीवनात अनेक लोक माणुसकी विसरले आहेत. अशा परिस्थितीत व्हायरल होणारा व्हिडिओ लोकांना माणुसकीचे दर्शन घडवण्याचे काम करत आहे. अनेकवेळा गरजू लोक मदत मागत असतात, पण आजूबाजूला असलेल्या लोक त्याकडे दुर्लक्ष करतात अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. मात्र, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग मुलगी रस्ता ओलांडताना दिसत आहे. ती रस्त्याच्या मधोमध येताच तिला रस्ता ओलांडताना मदत करण्यासाठी एक महिला दिव्यांग मुलीला थेट आपल्या पाठीवरती उचलून घेताना दिसत आहे.

हेही वाचा- “मैत्री नाही, मस्ती नाही…” बॉसची नोटीस वाचताच कर्मचारी संतापला, ऑफिसमधील चुकीच्या गोष्टी केल्या Viral

माणुसकीचे दर्शन घडवणाा व्हिडिओ व्हायरल –

हेही वाचा- गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक; तपासात थक्क करणारी माहिती समोर

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक पाय फ्रॅक्चर झालेली मुलगी काठीच्या साहाय्याने रस्ता ओलांडताना दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध येताच सिग्नल सुटतो त्यामुळे वाहने यायला सुरुवात होते. यावेळी दिव्यांग मुलगी घाबरते. तेवढ्यात शेजारी उभी असलेली एक महिला हे पाहून धावत येते आणि हाताने वाहनांना थांबण्याचे इशारा करते. एवढ्यावरच न थांबता ही महिला मुलीला पाठीवर घेते आणि रस्ता क्रॉस करते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या महिलेचं कौतुक करत आहेत. तर अनेकजण, ‘माणुसकी अजून जिवंत आहे आणि याचंच उदाहरण हा व्हिडीओ आहे’, असं म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending video of a woman helping a disabled girl to cross the road goes viral jap
Show comments