सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. काहीजण फेमस होण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण तरीही ते फेमस होऊ शकत नाहीत. मात्र, काही लोक असे असतात की, ते त्यांच्या अनोख्या आणि आश्चर्यकारक जुगाडामुळे एका रात्रीत प्रचंड फेमस होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस घोडा किंवा हत्ती नव्हे तर चक्क बैलावर बसून शहरातील रस्त्यांवरुन फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही.
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या थरारक व्हिडिओमध्ये एक तरुण बैलावर स्वार होत तो भरधाव वेगाने बैलाला पळवताना दिसत आहे. शिवाय यावेळी तो काहीतरी घोषणा देत असल्याचंही ऐकायला येत आहे. हा तरुण बैलाला अतिशय उत्तम पद्धतीने कंट्रोल करताना दिसत आहे. त्यामुळे या व्यक्तीला बैलांवर बसण्याचा अनेक दिवसांचा अनुभव असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. तर काहींनी, ‘त्याला तो घोड्यावर नव्हे तर बैलावर बसला आहे हे सांगा’ अशा मजेदार कमेंट्सही करत आहेत.
…अन् घोड्यासारखा पळवला बैल –
हेही पाहा- धावत्या ट्रेनमध्ये तरुणींचा डान्स होतोय Viral; Video वरच्या बर्थवर सुरु झाला खरा पण शेवटी घडलं भलतंच
हेही पाहा- रोबोट्सनी केले भरतनाट्यम नृत्य? Disneyland मधील ‘तो’ Video पाहून वाटेल कौतुक, पण खरंतर..
व्हिडिओमध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळी रस्त्यावर जास्त गर्दी नसताना एक एक तरुण कोणत्यातरी प्राण्यावर बसून आल्याचं दिसत आहे. सुरुवातीला तो तरुण एका घोड्यावर बसून भरधाव वेगाने येताना दिसत आहे. मात्र, काही वेळाने तो चक्क एका बैलावर बसून आल्याचं पाहायला मिळत आहे. तरुणाला असं बैलावरुन आल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
@copkumargaurav नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ४४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने भारतात काहीही होऊ शकतं अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने हा भल्लालदेव असल्याचं लिहिलं आहे.