चीनमध्ये सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनमधील लोकांच्या विचित्र आहाराच्या सवयीमुळे कोरोनासारखे विषाणू तिथे निर्माण होत असल्याचही अनेकांचे म्हणण आहे. चीनी लोक खात नाहीत असा एकही प्राणी आणि जीव आढळणार नाही असंही म्हटलं जातं. ते चीनी लोक अनेक प्राण्यांना आणि किटकांना खात असल्याचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- चक्क मगरीशी भिडला कुत्रा, जबडा तोंडात दाबला अन् मगरीला फरफटत नेलं, Video पाहून थक्क व्हाल

सध्या अशाच एका चीनी तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक तरुण जीवंत गांधील माशी खाण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे शिवाय हा किळसवाणा प्रकार असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. चीनमध्ये जीवंत किड्यांना खाणं हे काही नवीन नाही. ते अनेकदा रेशीम किड्यांच्या विविध अळ्या जिवंत खाताना दिसतात.

हेही पाहा- माशांसाठी कायपण! मासे खरदी करण्यासाठी चक्क ट्रेन थांबवून खाली उतरला ड्रायव्हर, मजेदार Video होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर व्हायपल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण जिवंत गांधील माशीला खायचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे. मात्र, तो या माशीला खाल्यानंचर तरुणाचे वाईट हाल झाल्याचं दिसतं आहे. सोशल मीडियावरील वापरकर्त्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या व्हिडिओमध्ये, एक तरुण चॉपस्टिक्सच्या मदतीने गांधील माशी धरलेला दिसत आहे. तो त्या माशीला तोंडात घेतो आणि खायला लागतो. त्याचवेळी ही माशी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर डंख मारते. त्यामुळे या तरुणाचे तोंड सुजल्याचं दिसतं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. @Instantregretss नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या तरुणाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली असून जो भविष्यात अशी चूक करणार नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना आपलं हसू आवरता आलं नसल्याचं सांगितलं आहे.