सोशल मीडियावर अनेक महिलांचे डान्स करतानाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. लोकांनाही हे व्हिडिओ पाहायला आवडतात. सध्या अशाच एका पंजाबी तरुणीचा डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या व्हिडिओमधील मुलगी ज्या उत्साहाने डान्स करत आहे ते पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. या मुलीचा उत्साह आणि एनर्जी जबरदस्त असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एखाद्या इव्हेंट किंवा रॅम्प शोमधील असल्याचं दिसत आहे. याठीकाणी अनेक पंजाबी लोक उपस्थित असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी गुलाबी रंगाच्या सूटमध्ये गुलाबी दुपट्टा घातलेली एक तरुणी स्टेजवर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. मागे लावले्या स्पीकरच्या ठेक्यावर या तरुणीने नाचायला सुरुवात करताचं उपस्थितांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…
Husband's Romantic Dance for Wife Wins Hearts
Video : भर रस्त्यावर तरुणाने बायकोसाठी केला जबरदस्त डान्स! हृतिक रोशनलाही टाकले मागे, व्हिडीओ एकदा पाहाच
Amazing dance on the street on the marathi song lallati bhandar viral video on social media
भररस्त्यात देवीचा “जागर” “लल्लाटी भंडार” गाण्यावर भन्नाट डान्स, व्हायरल VIDEOने जिंकली नेटकऱ्यांची मनं
son in law and father in law beautiful chemistry on Bollywood song
VIDEO : “सुनो ससुरजी…” जावयाची आणि सासरेबुवांची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले, “जावई असावा तर असा..”

हेही पाहा- लग्नमंडपात झोपून ‘अंग लगा दे’ गाण्यावर थिरकली, पाकिस्तानच्या या तरुणीची चर्चा का होतेय? पाहा Video

शिवाय या मुलीच्या डान्सच्या स्टेप्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून तरुणी अप्रतिम उर्जेने डान्स करत असल्याचंही लोक म्हणत आहेत. डान्स करताना ती आपल्या हातापायांना अशा प्रकारे फिरवत आहे की, जे पाहून तरुणी मार्शल आर्टचा सराव करत असल्याचा भास होत आहे. तर ‘नशीब या मुलीचे आसपास कोणी आलं नाही, नाहीतर तो स्टेजवरून जमिनीवर गेला असता, इतक्या जोरात ती डान्स करत आहे.’ असं नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- मृत्यूच्या दाढेतून सुखरुप परत येणं कशाला म्हणतात ते एकदा पाहाच; Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

नेटकऱ्यांना भावला डान्स –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @bhangratadka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तो २ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत. तर अनेकांनी मुलीच्या एनर्जीचं कौतुक केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये एका व्यक्तीने ‘आजपर्यंत पाहिलेल्या डान्समधील सर्वोत्कृष्ट डान्स असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे, ‘पंजाबी कुंग फू मिक्स भांगडा. उत्कृष्ट.’ तर आणखी एकाने डान्स पाहताना नजर हटेना असं म्हटलं आहे. व्हिडीओवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून तो नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे.

Story img Loader