सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही भयानक अंगावर काटा आणणारे असतात. मात्र काही काही व्हिडीओ भयानक असूनही नेटकरी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बस आणि ट्रॅक्टर चालकांमध्ये जोरदार भांडण सुरु आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा वाद हायवेवर सुरु आहे. या दोघांच्या भांडणामुळे हायवेवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका हायवरेवर PRTC (पंजाब रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन )ची एक बस दिसत आहे. या बसला एका ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे हायवेवर बस थांबली आहे. यावेळी रागवलेला बस चालक ट्रॅक्टर चालकाशी वाद घातल आहे. यावेळी अचानक बस चालक काठीने ट्रॅक्टर चालकाला मारहाण करायला सुरुवात करतो. त्यामुळे दोघे एकामेकाच्या अंगावर धावून जातात. या दोघांचा वाद पाहून इतर वाहनचालक त्या ठिकाणी येऊन भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पण या दोघांच्या भांडणामुळे मोठ्या प्रमाणात हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
या चालकांच्या भांडणाचा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ४९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, “ट्रॅक्टर ड्रायव्हर बसला ओढणार असल्याचं म्हणत आहे, पण त्याला कोणी बस ओढू देत नाहीये.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “दोघांमध्ये शर्यत लागली होती, ज्यामध्ये बस चालक जिंकला आहे पण त्याला ट्रॅक्टरवाला पैसे देत नाही.” तर तिसऱ्याने लिहिलं, “दोघांच्या भांडणात वाहतूक कोंडी झाली.”