सध्या सोशल मीडियावर वाहतूक पोलिसांनी एका महिलेशी केलेल्या अनोख्या वर्तनाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील पोलिसांच्या कृतीचं अनेकांनी समर्थन केलं आहे तर काही लोकांनी निषेध केला आगे. खरंतर वाहतूकीचे नियम वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी बनवलेले असतात. वाहनचालकांनी वाहतूक विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केलं तर त्यांचे अपघातापासून संरक्षण होते. त्यामुळे वाहतूक पोलिस सतत आपल्याकडून या नियमांचे पालन करुन घेत असतात. मात्र, काहीजण पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करत नाहीत.

पोलिस आणि वाहनचालकांमधील वादाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण एका महिलीने पोलिसांनी सांगूनही आपल्या कारचा दरवाचा उघडला नाही म्हणून पोलिसांनी असं काही केलं जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया पोलिसांचा आहे. व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन पोलिस कर्मचारी रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या महिलेला कारमधून बाहेर काढताना दिसत आहेत. मात्र ते या महिलेला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी चक्क कारच्या खिडकीची काच फोडली आहे.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल

हेही पाहा- ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय ठेवल्यामुळे महिलेवर ओढावलं संकट, अपघाताचा Video होतोय व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स पोलिसांनी एका जोडप्याला जुनी कार चालवल्याप्रकरणी अटक केली आहे. व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी गाडीची काच फोडून महिलेला बाहेर काढताना दिसत आहेत. जुनी कार चालवणे, पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देणे आणि उद्धट वर्तन केल्याचे आरोप या पती-पत्नीवर करण्यात आले आहेत.

हेही पाहा- वॉश बेसिनमध्ये बसून भांडी धुणाऱ्या वानराचा Video व्हायरल; पुरुषांना होतेय लॉकडाऊनची आठवण

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितलं की, पेट्रोलिंग करताना त्यांना रस्त्यावर एक जोडपे, जुलै २०२२ मध्ये नोंदणीची मुदत संपलेली कार चालवत असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी महिलेला ब्रेथ टेस्ट करण्यास सांगितले. मात्र तिने ती टेस्ट करण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. @KenBerhan नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.