निसर्गात अनेक अनोखे आणि आपण कधी कल्पनाही केलेली नसते अशी दृश्य आपणाला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये कधी एकाच ठीकाणी पडणारा मुसळधार पाऊस तर कधी दगडांच्या आकाराची बर्फवृष्टी पाहून आपणाला निसर्गाच्या ताकतीचा अंदाज येतो. शिवाय आभाळात तयार झालेला इंद्रधनुष्य तर आपण सर्व पाहतच असतो. आभाळात निर्माण होणारे वेगवेगळ्या आकाराचे ढग पाहायला अनेकांना आवडते.
मात्र, सध्या सोशल मीडियावर अशा ढगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून काहींना आनंद झाला आहे तर काही लोक घाबरले आहेत. कारण सिनेमांमध्ये ज्याप्रमाणे ढगातून काही उडती तबडकी खाली सोडल्याचं दाखवलं जातं, अगदी त्याप्रमाणे हे ढग दिसत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं अवगड होईल इतकं अखोखं हे ढग दिसत आहे.
हेही पाहा- मगरीच्या अंगावर बसून भरधाव वेगाने बाईक चालावतोय ‘हा’ तरुण; Video पाहून तुमचाही थरकाप उडेल
या घटनेचा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शममध्ये हे अनोख दृश्य तुर्कीमधील बुर्सा या ठीकाणचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेकांनी हे यूएफओ आकाराचा एक महाकाय आणि अविश्वसनीय ढगाची निर्मिती आपापल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचे व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
हेही पाहा- Video: ८८ व्या वर्षी आजोबांचं नशीब पालटलं, जिंकली ५ कोटींची लॉटरी; म्हणाले “३५ ते ४० वर्षापासून…”
या व्हिडीओमधील ढगाचा रंग नारंगी, पिवळा आणि गुलाबी झाळ्याचं दिसत असून हे आकाशातील रोमांचक आणि अद्भूत असं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत असून आतापर्यंत तो १ मिलियनहीन अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांना तो आवडला असून लोक त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका नेटकऱ्याने हे अविश्वसनीय दृश्य असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने आजपर्यंत असले ढग फक्त सिनेमांमध्येच पाहिले होते असं म्हटलं आहे.