सोशल मीडियावर रोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ असे असतात ते बघून आपणाला काय करावं आणि काय नको याबाबतचा धडा मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विनाकारण एका म्हशीसमोर दुचाकीची एक्सलेटर वाढवण किती महागात पडू शकतं याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. शिवाय विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देणं अनेकजण हा व्हिडीओ पाहून बंद करतील यात शंका नाही.
हेही पाहा- निसर्गाचं ऑप्टिकल इल्यूजन पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; या जादूई काडीचा Video होतोय Viral
अनेकांना प्राण्यांची विनाकारण छेड काढून मज्जा घेण्याची सवय असते. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. शिवाय काही व्हिडीओ असे असतात ज्यामध्ये प्राण्यांची छेड काढणाऱ्यांना त्याचे गंभीर परिणामदेखील भोगायला लागल्याचं पाहायला मिळतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल दिसून होत आहे. त्यामध्ये दुचाकीवरुन निघालेल्या दोन तरुणांना एका म्हशीची छेड काढणं महागात पडल्याचं दिसत आहे. कारण या म्हशीने या तरुणांना असा काही धडा शिकवला आहे तो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
हेही पाहा- Video: लहान माशाच्या आमिषाने आला मोठा मासा आणि पुढे जे झालं ते पाहून म्हणाल, आमिष वाईटच…
सोशल मीडियाच्या जमान्यात फोटो सेशनच्या नावाखाली लोक प्राण्यांजवळ जातात. मात्र, लोकांना फोटो काढायला आवडत असलं तरी प्राण्यांना हवी असणारी शांतता भंग होते. त्यामुळे अनेक वेळा प्राणी संयम गमावून रागारागात लोकांना इजा करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये म्हशीची विनाकारण छेड काढणं दोन दुचाकीस्वारांना महागात पडलं आहे.
व्हिडिओमध्ये दोन दुचाकीस्वार रस्त्याने जाताना दिसत आहेत, ते रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका म्हशीजवळ थांबताना दिसतं आहेत. थांबून ते त्यांच्या बाईकची एक्सलेटर वाढवतात. मात्र, त्यांच्या बाईकच्या आवाजाने म्हैस रागवते आणि ती त्या दुचाकीच्या मागे धावत सुटते. बाईकवरील दोघेही भीतीने बाईक पळवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्यापेक्षा जास्त वेगात धावणारी म्हैस दुचाकीस्वारांवर हल्ला करते.
यादरम्यान दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला झुडपात पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. हा व्हिडिओ सोशल ‘फन व्हायरल विड्स’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला शेकडो लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी वेगवेळ्या कमेंट या व्हिडीओखाली करत आहेत.