Trending Video Viral : महाराष्ट्रातील संस्कृती विविध लोकसंगीत अन् वाद्य प्रकारने नटलेली आहे. याच वाद्य प्रकारातील एक प्रकार म्हणजे संबळ वादन. संबळ वाजलं आणि तुमची पावलं थिरकली नाही असं कधी होणार नाही. संबळमध्ये एक विशिष्ट प्रकारचा लय, ताल असतो, जो अनेकांना नाचायला भाग पाडतो. त्यामुळे आजही अनेक लोकसंगीत आणि लोककलांमध्ये संबळ वादनाचे सादरीकरण होते. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा संबळ वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला वाटेल कलेला खरचं वय नसते. तुम्ही कोणत्याही वयात तुमची आवडती कला जोपासू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये एका चिमुकल्याने अतिशय उत्कृष्टपणे संबळ वादन केलं आहे. सोशल मीडियावर संबळ वादनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, या व्हिडीओत एका चिमुकल्याने एका मोठ्या संबळ वादकाच्या तोडीस तोड संबळ वादन केलं आहे. त्याच्या संबळ वादनाने आता अनेकांचं मनं जिंकलं आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला गळ्यात संबळ घालून उभा आहे. यावेळी एक व्यक्ती चिमुकल्याला म्हणतो की, ”असं वाजवं की अंगावर काटा आला पाहिजे अन् लोकं नाचले पाहिजे.” मग काय, चिमुकला हातातील काठ्या घेऊन संबळ वाजवण्यास सुरुवात करतो. तो जसजसा संबळाचा एक एक ताल वाजवू लागतो, तसातसे उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावरही एकच आनंद दिसू लागतो. यावेळी आजूबाजूचे लोकही त्याचे संबळ वादन पाहण्यासाठी गर्दी करतात. चिमुकला संबळ वादन वाजवण्यास जसा सुरुवात करतो तेव्हा त्याचा ताल ऐकून तुमचेही पाय ठेका धरू लागतील.

चिमुकल्याच्या संबळ वादनाचा हा सुंदर व्हिडीओ ( Video) @marathiasmitaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘चिमुकल्याकडून जबरदस्त संबळ वादन, कलेला वय नसते’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच कमेंटच्या माध्यमातून त्याच्या कलेला दाद देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘भावा तुझ्यासाठी नाचणार’, तर दुसरा युजर म्हणतोय की, ‘वाह छोटे उस्ताद लाजवाब’, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.