सोशल मीडिया हे इतकं शक्तिशाली व्यासपीठ बनले आहे की ते केवळ एका क्लिकवर कोणाचंही नशीब पालटू शकतं. एखाद्याला रातोरात स्टार बनवू शकतो. तर हाच सोशल मीडिया अनेकांच्या नशीबाचं चक्र देखील फिरवू शकतो आणि पुन्हा बॅकफूटवर आणू शकतो. ‘बचपन का प्यार’ हे गाणं गाऊन प्रसिद्धीझोतात आलेला आणि रातोरात स्टार बनलेल्या सहदेवसारखी अशी अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. याच यादीत आता आणखी एक व्यक्ती सामील झाला आहे जो एक वेगळं गाणे गाऊन आपले बदाम विकतोय, त्याच्या स्टाइलने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पश्चिम बंगालचा आहे. भुवन बदायकर असं या बदाम विकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. यापूर्वी भुवन आपल्या परिसरात बदाम विकण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध होता, मात्र आता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभर प्रसिद्ध झाला आहे. त्यांचं गाणं आता सर्वांच्याच ओठांवर येताना दिसून येत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : जनतेचं मत समजून घेण्यासाठी पत्रकाराने गाव गाठलं, पण आजोबांचं उत्तर ऐकून चक्रावून गेला
भुवन बदायकरचा व्हिडीओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सायकलवर त्याने विकण्यासाठीचे बदाम ठेवले आहेत. घरोघरी जाऊन बदाम विकता विकता तो यमकांसह ‘कच्चा बादाम’ गाणं म्हणू लागतो. त्याचं हे गाणं इतकं अप्रतिम आहे की ते पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी लोक हा व्हिडीओ पाहत आहेत. हा गाणं लोकांना इतकं आवडू लागलंय की, आता तर या गाण्यांवर लोकांनी त्यांच्या डान्सचे बरेच व्हिडीओ बनवले आहेत आणि शेअरही केले आहेत. भुवननेही हातात काही बांगड्या, मोबाईल आणि चैन घेतली असून तो दुसऱ्या हाताने वाजवताना दिसून येत आहे.
आणखी वाचा : ‘जंग जारी है, MSP की बारी है’, आंदोलक शेतकऱ्याची लग्नपत्रिका VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : हरीण आपल्यातच धुंदीत, दबा धरून बसलेल्या बिबट्याने चढवला हल्ला
पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेले भुवन बदायकर हे आपले बदाम कधी खेड्या-पाड्यात विशिष्ठ पद्धतीने विकतात, कधी सायकलवर तर कधी दुचाकीवर. बदाम विकण्याची त्यांची ही स्टाईल बरीच चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुवन हा बीरभूम जिल्ह्यातील दुबराजपूर ब्लॉकमधील कुरलपुरी गावचा रहिवासी आहे. भुवनकडे सायकल असते. सायकलवर एक प्लास्टिक पिशवीत तो बदाम घेऊन विकतो. याशिवाय काही दागिने आणि एक तुटलेला मोबाईल त्याच्याकडे शिल्लक आहे. तो कुठेही गेला तरी ‘कच्चा बदाम’ म्हणत आपल्या खास पद्धतीने बदाम विकतो.
आणखी वाचा : नवरीने नातेवाईकांसोबत केला जबरदस्त भांगडा डान्स, लग्नाचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
आणखी वाचा : दोन ट्रेनमध्ये अडकलेल्या घोड्याचा जीव कसा वाचला? VIRAL VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल!
अलीकडेच गोधुली बेला म्युझिक नावाच्या यूट्यूब चॅनेलनेही त्याचे रॅप व्हर्जन शेअर केले आहे. यामध्ये भुवनची ही बदाम विकण्याची खास पद्धत दाखवण्यात आली आहे. यात खुद्द भुवनही दिसत आहे.