सोशल मीडियावर जेव्हापासून छोट-छोटे व्हिडीओ आणि रिल्स सुरू झाले आहेत. तेव्हापासून लोक त्यांचे अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करतात आणि काही सेकंदात ते वेगाने व्हायरल देखील होऊ लागतात. याचा फायदा घेऊन ज्यांना डान्सची आवड आहे असे लोक आपल्या वेगवेगळ्या डान्सचे व्हिडीओ बनवून ते इन्स्टाग्रामवर आपले फॉलोअर्स वाढवतात. हल्लीच्या काळात नववधू सजून मंडपात नवरदेवाची वाट पाहण्याऐवजी संपूर्ण वऱ्हाडी मंडळींसमोर डान्स करत लग्नाचा आनंद साजरा करतात. सध्या असाच एका नवरीच्या धांसू डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमधील नवरीबाईने तिच्या बहिणीसोबत अली खानच्या नुकत्याच आलेल्या ‘चका चक’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरी आणि तिची बहीण स्टेजवर जवळपास सारख्याच पोशाखात सुंदर डान्स करताना दिसून येत आहेत. यावेळी लग्न मंडपातील पाहुणे आणि नातेवाईक त्यांचा हा धांसू डान्स पाहून खूप जल्लोष करताना दिसून येत आहेत. दोन्ही बहिणींचा हा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा या व्हिडीओवरून तुमची नजर हटवू शकणार नाहीत. या व्हिडीओमध्ये दोघांनीही सारा अली खानच्या या गाण्यातील मूळ स्टेप्स कॉपी करत चांगलाच ठेका धरलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : काय सांगता, चक्क विमानातून निघाली लग्नाची वरात…! चेहऱ्यावर मास्क लावून गाणं गात केला प्रवास

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पत्नीने दिलेलं गिफ्ट उघडताच तो भावूक झाला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले…, तुम्हीही व्हाल भावूक

हा व्हिडीओ ‘द वेडिंग मिनिस्ट्री’ पेजने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि हजारो व्ह्यूज आणि लाईक्ससह व्हायरल झाला आहे. नुकतीच ‘अनुपमा’ मालिकेतील अभिनेत्री रुपाली गांगुलीही सारा अली खानसोबत तिच्या नव्या कोऱ्या ‘चका चक’ गाण्यावर डान्स करताना दिसली. रूपालीने एका आठवड्यापूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आणि तो १.३ मिलियन पेक्षा जास्त लाईक्ससह व्हायरल झाला. रुपाली आणि साराने गाण्याच्या हुक स्टेप्स सुंदरपणे साकारल्या आणि त्यांच्या खेळकर अभिनयाने हजारो नेटिझन्सची मने जिंकली.

आणखी वाचा : स्वतःच्या सावलीसोबत खेळताना कुत्र्याचा VIDEO VIRAL, पाहून खळखळून हसाल

‘सतरंगी रे’ चित्रपटातील ‘चका चक’ या गाण्याचं वेड लोकांना लागलं आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सारा अली खान यांनी काम केलं आहे. ‘चका चक’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. हे ऐकून लोकांचे पाय थिरकू लागतात. या गाण्यावर सारा अली खानने जबरदस्त डान्स केला असून या गाण्याला श्रेया घोषालने आवाज दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending video viral on desi bride and her sister dance on sara ali khan song chaka chak on wedding prp