Viral video: नणंद-भावजयीचं नातं म्हटलं तर प्रेमाचं, पण म्हटलं तर वादाचंही असतं. लग्न करून घरात आलेल्या मुलीला नवरा, सासू-सासरे यांच्याबरोबरच दीर व नणंदांनाही आपलंसं करून घ्यावं लागतं; मात्र त्या घरावर हक्क सांगणारी नणंद काही वेळा भांडणाचं कारण ठरते. मात्र सध्या समोर आलेली नंदण भावजयीचं नातं या सगळ्याला अपवाद आहे. सोशल मिडियावर तर विविध व्हिडियोंची रांग लागलेली असते. यातील अनेक व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात. यामध्ये दिर-वहीनी, नणंद-भावजय आदींचे डान्स व्हिडिओ लगेच प्रसिद्ध होतात. लोकांचीही अशाप्रकारच्या व्हिडिओजना विशेष पसंती मिळते. सध्या एका नणंदेचा आणि वहिनीचा डान्स व्हायरल होतोय. इतकं काय भन्नाट आहे या डान्समध्ये जाणून घेऊ…

लग्नानंतर मुलीचं आयुष्य खूप बदलतं. नवं घर, नवी नाती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. घरात नणंद असेल, तर वाद होण्याची शक्यता जास्त असते. कारण ती त्या घरात लहानाची मोठी झालेली असते. असं असलं तरी नणंद व भावजयीचं नातं बहिणींसारखं असतं. काही वेळा तर बहिणींपेक्षाही जास्त चांगलं नातं नणंद-भावजयींचं असतं. अशाच नणंद आणि वहिनीनी लग्नामध्ये भन्नाट डान्स केला आहे. आतापर्यंत तुम्ही लग्नातले नवरा-नवरीचे अनेक डान्स पाहिले असतील पण नणंद-वहिनींच्या जोडीच्या डान्सची सध्या एकच चर्चा सुरु आहे.

आपल्या देशात अनेक पारंपारिक नृत्ये प्रसिद्ध आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते.प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नणंद-वहिनींच्या जोडीनं लग्नामध्ये “देख तुनी बायको कशी नाची रायनी कशी कुदी रायनी कशी डोली रायनी” या खानदेशी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. दोघीही इतक्या मनसोक्त नाचल्या आहेत की सर्वच पाहत राहिले आहेत. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात.

पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर maharashtrian_look_02 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “नंणद असावी तर अशी हौशी” तर आणखी एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “माय नको सोडजो रे भो.”

Story img Loader