‘दो चाय लाना मला मार के’ ही वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण तुम्ही कधी कुणाला ‘चाय लाना बटर मार के’ म्हणताना ऐकलं आहे का? जर तुम्ही ऐकलं नसेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की छंदांच्या बाबतीत ‘टी लवर्स’ना कशाचीच तोड नाही. कारण भावांनो… बन-बटर, बटर-मॅगी, बटर-ऑम्लेट नंतर आता ‘बटर-चहा’ येतोय, ज्यामध्ये इतकं बटर टाकलं जातं की या चहाची चव कशी असेल, असा प्रश्न तुम्हाला पडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही चहा प्रेमी आहात का? मग तुम्ही आतापर्यंत तुम्ही अद्रक टी, लेमन टी, ब्लॅक टी, ग्रीन टी, मसाले चहा, वेलची चहा यांसारखे विविध प्रकारचे चहा पिला असाल. पण, तुम्ही कधी ‘बटर टी’ प्यायली आहे का? होय, ऐकून तुम्हाला सुरूवातीला विचित्र वाटेल, पण हे खरंय. अलीकडेच एका रस्त्यावरील विक्रेत्याचा ‘बटर चाय’ बनवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. @eatthisagra नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरू हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : जेव्हा कुत्र्याने रस्त्यावरच्या बेघर माणसाला घट्ट मिठी मारली… हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल भावूक

या व्हिडीओच्या सुरूवातीला विक्रेत्याने दूध उकळण्यास घेतलेलं दिसून येत आहे. मग तो त्यात चहापत्ती, साखर, मसाला आणि बटरचा एक तुकडा घालतो! चहाला चांगलं ढवळून आणि उकळल्यानंतर तो कुल्हडमधअये चहा सर्व्ह करतो. हा व्हिडीओ आग्रामधला असल्याचं सांगण्यात येतंय. एका एका रस्त्यावर राम बाबू नावाचा विक्रेता त्याच्या टपरीवर हा आगळा वेगळा चहा लोकांना देतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न मंडपात नवरा-नवरी बसले अन् पावसानं हजेरी लावली, पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! इतकी गर्दी… ‘या’ भागातला करोना पळाला का?

बटर टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्याला तरूण ठेवण्यात आणि आरोग्याला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात. बटर हे खरं तर वजन वाढवणारा पदार्थ आहे, पण गरम चहामध्ये मिसळून ते वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यातल्या हेल्दी फॅटमुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं आणि त्यामुळे अनावश्यक अन्न घेणं टाळलं जातं.

सध्या या ‘बटर चहा’चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक या आगळ्या वेगळ्या चहाची जोरदार चर्चा करत आहेत. तसंच हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत लोकांना या आगळ्या वेगळ्या चहाबद्दल माहिती देताना दिसून येत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत. काही चहा प्रेमींनी या व्हिडीओवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.