Lift Viral Video : इमारतींचे मजले जसे वाढू लागले, तशी चढण्या-उतरण्यासाठी लिफ्टची गरजदेखील वाढू लागली. हल्ली इमारतींच्या आकारानुसार लिफ्टची रचनाही बदलत गेल्याचे दिसते. पण, सोशल मीडियावर सध्या अशा एका विचित्र लिफ्टचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही शॉक व्हाल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून ही नक्की लिफ्ट आहे की शवपेटी, असा सवाल केला आहे.
ही लिफ्ट इतकी लहान आहे की, त्यात कोणीही उभे राहू शकत नाही. एका व्यक्तीशिवाय या लिफ्टमध्ये छोटी बॅग ठेवायलाही जागा नाही. एवढी छोटी लिफ्ट तुम्ही कोणत्याही इमारतीत पाहिली नसेल.
हा व्हिडीओ @ghantaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लिफ्टमध्ये स्लायडिंग नेट नसून, त्याला फ्रिजप्रमाणे दरवाजा आहे. या लिफ्टमधून एक अतिशय बारीक महिला आत जाते. लिफ्टमध्ये कॅमेरा असल्याने ती महिला किती लहान आहे ते तुमच्या लगेच लक्षात येईल. लिफ्टमध्ये महिला उभी असताना खालची फरशीपण व्यवस्थित दिसत नाही.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, क्लॉस्ट्रोफोबिक लोकदेखील हे पाहत असतील. दुसऱ्या युजरने लिहिले की, माझे क्लॉस्ट्रोफोबिक व्यक्तिमत्त्व मला कधीही त्यात येऊ देणार नाही. तिसऱ्या युजरने लिहिले की, जर लिफ्ट तुटली. तर ती नंतर शवपेटी म्हणून वापरली जाऊ शकते. चौथ्या युजरने लिहिले की, मला माफ कर; हे पाहिल्यानंतर मला श्वास घेतानाही त्रास होतोय. शेवटी एकाने लिहिले की, हे पाहून मला गुदमरल्यासारखे वाटतेय.