Truck Accident Video : आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात. हल्ली लोक इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात पण त्यात संधी मिळाली तर फक्त स्वत:चा फायदा बघत राहतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक अपघात होतात. या अपघातावेळी काहीजण मदत करण्याऐवजी चालकाचे पैसे, दागिने किंवा त्याच्या गाडीतील वस्तू चोरी करत पसार होतात. गाझियाबादमधील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये एका मोठ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातावेळी लोक चालकाला मदत करण्याऐवजी स्वत:चा फायदा पाहून ट्रकमधील सामान चोरुन निघून जातायत. (truck accident viral video)
भीषण ट्रक अपघाताचा व्हिडीओ ( Ghaziabad Truck Accident today)
रस्ते अपघात ही देशातील चिंतेचा विषय बनत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक वाहतूकीचे नियम पाळत नाहीत. यात अनेकदा रात्रीच्या वेळी भरधाव ट्रक अनेकदा अपघाताचे बळी ठरतात. आता हा व्हिडीओच पाहा ना ज्यात समोर आलेला ट्रक थेट जाऊन रस्त्याच्या दुभाजकाला धडकतो यावेळी उपस्थित लोक त्याला मदत करण्याऐवजी ट्रकमधील सामान आरामात चोरी करुन नेतात.
माणूसकी शिल्लक राहिलेय की नाही? युजर्सचा सवाल
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गाझियाबादच्या लाल कुआन हायवेवरील असल्याचे सांगितले जात आहे, या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, कोल्ड ड्रिंकच्या बाटल्यांनी भरलेला एक मोठा ट्रक दुभाजकाला धडकला आणि ट्रकमधील काही कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या. यावेळी लोक ट्रक चालकाची मदत करण्याऐवजी अपघातग्रस्त ट्रकमधील कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्यांचे कॅरेट उचलताना दिसत आहेत.
More Storie On Trending : “फक्त क्लास १ अधिकाऱ्यांसाठी” सरकारी कार्यालयातील शौचालयातील ‘तो’ PHOTO पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, “इंग्रज…”
आश्चर्याची बाब म्हणजे एक व्यक्ती व्हिडीओ शूट करत असताना एक कार चालक तिथे येऊन थांबतो आणि कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्यांचे कॅरेट उचलून निघून जातो. यावेळी व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्याला अडवतो आणि असे का करत आहे असे विचारते, ज्यावर तो कार चालक काहीच उत्तर न देता फोनवर बोलत शांतपणे निघून जातो. पण कार चालकाची ही कृती पाहून माणसात आता माणुसकी शिल्लक राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
हा व्हिडिओ X वर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे, ज्यावर लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी त्या तरुणाच्या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांनी हे फारच वाईट असल्याचे म्हटले आहे.