Shocking Bike Accident: जगभरात रस्ते अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशा भयंकर अपघातात अनेकदा माणसं जखमी होतात; तर काही जण या अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. कधी वाहनचालकाच्या चुकीमुळे, तर कधी दुसऱ्यांच्या चुकीमुळे अशा अपघातांना अनेकांना सामोरं जावं लागतं. एका क्षणात त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. अनेक जण वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे अशा दुर्घटना होतात.
सोशल मीडियावर अशा अपघातांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. सध्या अशीच एक दुर्घटना एका ठिकाणी घडली आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये झालेला अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल. नेमकं असं झालं तरी काय ते जाणून घेऊ…
तेलंगणामधील एका धक्कादायक घटनेत ट्रकने धडक दिल्याने दुचाकीला भीषण आग लागली. राज्यातील नरसापूर चौकात रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत दशरथ नावाचा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
हेही वाचा… त्याची एक चूक अन् चिमुकली आगीत अक्षरश: होरपळली; घरात लहान मुलं असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
१ डिसेंबर २०२४ चा टाइमस्टॅम्प असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हैदराबाद महानगर प्रदेशातील तुपरान परिसरात असलेल्या नरसापूर चौकात एक ट्रक प्रवास करत असल्याचे उघड झाले.
भीषण अपघाताचा व्हिडीओ
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बाईकस्वाराला उडवलं. ट्रकने उडवताच बाईकस्वार ट्रकखाली आला आणि तेवढयात बाईकने पेट घेतला. बाईकने पेट घेताच दुचाकीस्वार आगीत होरपळला. आपला जीव वाचवण्यासाठी तो रस्त्यावर झोपून आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसला. तेवढ्यात आजूबाजूला गर्दी जमली आणि माणसं दुचाकीस्वाराच्या मदतीला धावून आली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @TeluguScribe या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून “मेडक जिल्ह्यातील थुपरन शहरातील नरसापूर चौकात दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
हेही वाचा… VIDEO: भयंकर अपघातात महिलेसह चिमुकल्याचा ‘असा’ वाचला जीव; बसमध्ये जे घडलं ते पाहून उडेल थरकाप
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बाईक चालवणाऱ्यांनी जड वाहनांचे ब्लाइंड स्पॉट समजून घेणे आवश्यक आहे, त्यामुळे अनेकांचे जीव वाचतील.” तर दुसऱ्याने “यात दुचाकीस्वाराची चूक आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “माणुसकी अजून जिवंत आहे, काही लोक व्हिडिओ काढण्याऐवजी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.”