‘सुबह पहली (टिंग टांग टिंग टांग)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुबह पहली (टांग टांग टिंग टांग)’

ही किंवा यासारखी ओळ कानावर पडली की पहिल्यांदा काय आठवतं? खडबडीत चेहऱ्याचे अलताफ राजासारखे गरिबांचे मोहम्मद रफी डोळ्यासमोर येतात ते नंतर. पण आधी नजरेसमोर येतो तो आपल्या बलदंड बाहूंनी देशभर फिरणारा ट्रकवाला आणि त्याने लावलेली गाणी.

संगीताचा हा प्रकार एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे पण आपल्याला अंतर्बाह्य तळमळवणारी ही गाणी ट्रकवाले का लावतात याचं कारण उमगत नाही. आपल्या हृदयाच्या प्रत्येक कप्प्यातलं रक्त ढवळत ढवळत आपल्याला जागं ठेवू शकण्याची जी ताकद या गाण्यांमध्ये आहे ती कशातच नसावी. रात्र रात्र जागवत ट्रक चालवणाऱ्या या ड्रायव्हर्सना या गाण्यांचा असाच उपयोग होत असावा.

व्हिडिओ: आयुष्यात नारळ मिळालाय? तो असा फोडा

‘ट्रक्कं’ (आता नजरेसमोर लस्सी पिणारा पापाजी आणा) चालवणारे हे सगळे गडी तसे मजबूत. दिवसाचे १४-१४ तास विनाविश्रांती हायवेवर ट्रक चालवणं काही खायचं काम नाहीये त्यामुळे या  सगळ्यांची वेगळीच एक जीवनशैली तयार झालेली असते. त्यांच्या त्यांच्या वेगाने आणि पध्दतीने त्याचं आयुष्य सुरू असतं.

आता पहा हा निधड्या छातीचा काडी पैलवान. ‘ट्रक चालवून चालवून काटक शरीराचा वगैरे’ लिहिलं असतं याच्याबद्दल पण हा काय करतोय ते या व्हिडिओमध्ये पाहा आणि शेवटपर्यंत पाहा.

कुठे नेऊन ठेवलीये वाहतूक माझी? का नाही होणार अपघात हायवेवर? इंडिया वाँट्स टू नो.

तसं नाही म्हणायला वगैरे रस्त्यावर वाहतूक नसताना वगैरे त्याने हा प्रकार केल्याचं वगैरे आहे. पण का? का?

याचा अॅक्सिडंट न होवो

याच्यामुळे दुसऱ्याचा अॅक्सिडंट न होवो

याच्या डोक्यात लवकर अक्कल येवो.

हाय रब्बा!