माणूस माणसांशीच स्वार्थी भावनेतून वागायला लागला आहे. हल्लीच्या स्वार्थी युगात माणूसकी हरवत चालली आहे की काय असं वाटू लागतं. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो पाहून माणूसकी अजूनही जिवंत आहे, असंच म्हणावं लागेल. या व्हिडीओमध्ये आजी पाणी चाललेल्या खड्ड्याच्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असते. हे पाहून तिथून जाणाऱ्या ट्रक चालकाने एक भन्नाट आयडिया वापरत आजीला मदत केलीय. एक मनमोहक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या हृदयाला भिडला आहे आणि तुम्हालाही तो आवडेल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजी पाण्याने भरलेल्या रस्त्यावर उभ्या असलेल्या दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे रॅम्प जोडलेला एक ट्रक उभा असतो. पाण्याने भरलेल्या खड्ड्याच्या पलीकडे या आजींची कार पार्क केलेली असते. या कारमध्ये बसण्यासाठी आजींना आधी पाण्याने भरलेला हा खड्डा पार करावा लागणार होता. परंतू त्यात पाणी इतकं साचलं होतं की आजींना या खड्ड्याच्या पलीकडे जाताच येत नव्हते. अखेर शेजारी पार्क केलेल्या ट्रकच्या मदतीने या आजी खड्ड्याच्या पलीकडे जाऊन कारमध्ये बसतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मित्राने केली नको ती मस्करी! नवरदेव खवळला अन् लग्नमंडपातच सुरू झाली मारामारी

ट्रक चालकाने त्याच्या ट्रकच्या मागच्या बाजूस असलेले रिट्रॅक्टेबल रॅम्प पुढे केले. आजी ज्या ठिकाणी उभी असते बरोबर त्याच ठिकाणी ट्रक चालक त्याचा रिट्रॅक्टेबल रॅम्प समोर आणतो. आता आपल्याला खड्डा पार करता येणार या आनंदाने आजी मोठ्या उत्साहात या रिट्रॅक्टेबल रॅम्पवर चढतात आणि खड्डा पार करून आपल्या कारमध्ये जाऊन बसतात. या रिट्रॅक्टेबल रॅम्पवर चढण्यासाठी सुद्धा ट्रक चालक आजीला हात देऊन मदत करताना दिसतोय. हे दृश्य खरोखरंच खूप सुंदर आहेत. आजच्या धावत्या युगात अनोळखी माणसांसाठी व्यक्तींकडे एक मिनिट सुद्धा नसतो. पण या ट्रक चालकाने भन्नाट आयडिया वापरून आजीला मदत केली हे पाहून नेटकऱ्यांचे मन प्रसन्न झाले आहे.

आणखी वाचा : लेकीला पोटाशी घेऊन फूड डिलिव्हरी करतेय ही महिला, VIRAL VIDEO पाहून जनता झाली भावूक

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओ तानसू येगेनने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह लोकांना अवरता येत नाहीय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ८ लाख १५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत ट्रक चालकाचं कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader