truck driver helps young girl cross waterlogged street during heavy Rainfall: मुसळधार पावसाने सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्याची स्थिती आहे. तर काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: अनेक शहरांमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीचा सर्वांत जास्त फटका नेहमीच सर्वसामान्य लोकांना बसतो. मुसळधार पावसामुळे कामावरून घरी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच सोशल मीडियावर भरपावसात माणुसकीचे दर्शन घडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील साठलेल्या पाण्यात तरुणी अडकलेली दिसतेय. तेवढ्यात एक ट्रकचालक देवासारखा धावत येतो आणि तिला ज्या प्रकारे मदत करतो, ते पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुसळधार पावसामुळे दोन्ही बाजूंचे रस्ते अक्षरश: पाण्याखाली गेलेत. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर गाड्यांशिवाय जास्त लोक दिसत नाहीयेत. यावेळी रस्त्यावर गुडघाभर पाणी साठलेले होते. अशा परिस्थितीत चालण्यासाठी रस्ता नसल्याने एक तरुणी रस्त्यामधील दुभाजकावर चढते आणि चालू लागते. तितक्यात एक सिमेंट मिक्सर ट्रक येऊन तरुणीच्या अगदी जवळ थांबतो.
मुसळधार पावसात अडकली तरुणी, व्हिडीओ व्हायरल (Heavy Rainfall Viral Video)
पावसाच्या पाण्यात अडकलेल्या तरुणीच्या मदतीसाठी धावून आला ट्रक ड्रायव्हर ( truck driver helps young girl cross waterlogged street)
अचानक जवळ येऊन थांबलेला ट्रक पाहून तरुणी घाबरते; पण ट्रकचालक तिला मदत करण्यासाठी थांबल्याचे सांगतो. यावेळी तरुणी चालकाने सांगितल्याप्रमाणे मिक्सर ट्रकवर बसते आणि पाण्याने भरलेला रस्ता पार करते. अशा प्रकारे ट्रकचालक त्या तरुणीच्या मदतीसाठी देवासारखा धावून आल्याची प्रतिक्रिया अनेकांनी यक्त केली आहे.
हा हृदयस्पर्शी हा व्हिडीओ @Sachkadwahai नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आता युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करीत ट्रकचालकाचे आभार मानत आहेत. कारण- मुसळधार पावसासारख्या स्थितीत अनेक जण स्वत: सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी धडपडत असतात.
पण, फार कमी असे लोक असतात की, जे स्वत:चा जीव धोक्यात असतानाही इतरांनाही मदत करतात. या ट्रकचालकाने तरुणीचा धोक्यात असलेला जीव वाचवून तिला मदत केली. त्यामुळे युजर्स या “ट्रकचालकाला मोठ्या मनाचा माणूस” असे म्हणत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही युजर्स, खरंच खूप समाधान वाटले, असे म्हणत आहेत. काही जण ट्रकचालकामधील माणुसकीला सलाम करीत आहेत.