ड्रायव्हिंग करताना नीटपणे गाडी चालवा असं कानीकपाळी ओरडूनही अॅक्सिडंट करणारे महाभाग आपल्याला खोऱ्याने सापडतात. गाडी चालवणं हेच मुळात कौशल्याचं काम. त्यातही दारू वगैरे पिऊन जर कोणी गाडी चालवत असेल तर सत्यानाश.

पण तुम्ही जर ट्रकवाल्यांशी कधी बोलल असाल तर तुम्हाला माहीत असेल की बारा-अठरा तास न झोपता ट्रक चालवण्यासाठी ते काही ‘उपाय’ करतात. मग यात दारू पिणं आलं, गुटखा , मावा खाणं आलं. एकदा का हा ‘डोस’ गळ्याखाली उतरला की ही मंडळी रोबोटसारखे ट्रक चालवत राहतात. अर्थातच असं कधीही करू नये.

A truck carrying 35 tonnes of betel nuts from Assam to Mumbai went missing
गोंदिया : आसाम वरून मुंबईला जाणारे सुपारीचे ट्रक बेपत्ता
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
youth stabbed with sickle Bopodi, Bopodi area,
पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, बोपोडी परिसरातील घटना

पण या बातमीतला ट्रकचालक एवढा ‘साधासुधा’ नव्हता. कारण याने चक्क ड्रग्ज घेतले होते. आणि असा महाभयंकर जालीम डोस घेतल्यावर हा भाऊ जो सुटला तो ३००० किलोमींटर ट्रक चालवून मगच थांबला.

ही बातमी आहे ती अमेरिकेतली. अमेरिकेत अलास्कामधल्या गॅरी राॅबिन्स या ट्रकचालकाने हा प्रताप केला आहे. गॅरीने कोकेन घेत आपला ट्रक भरधाव सोडला. तो आपला हा ट्रक चालवत अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स राज्यामध्ये आल्यावर त्याला पोलिसांनी अटक केलं. आणि सगळ्यात धमाल म्हणजे हे ३००० किलोमीटर ट्रक चालवताना त्याने एकही स्टाॅप घेतला नाही.

गॅरी राॅबिन्स पकडलाही गेला नसता, पण मॅसॅच्युसेट्स राज्यामध्ये त्याला ट्रक चालवताना एका दुसऱ्या माणसाने पाहिलं. गॅरी राॅबिन्सचं ड्रायव्हिंग पाहून या माणसाला संशय आला आणि त्याने पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्या जबाबावरून, त्याच्या गाडीची झडती घेऊन आणि इतर राज्यातल्या पोलिसांबरोबर केलेल्या चौकशीवरून त्यांची झोपच उडाली. गॅरी राॅबिन्स चक्क ३००० किलोमीटर नाॅनस्टाॅप ट्रक चालवत आल्याचं स्पष्ट झालं. आपला ट्रक हाणताना त्याने कितीतरी ट्रॅफिकचे नियम मोडले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता गॅरी राॅबिन्सचं लायसन्स रद्द करण्यात आलंय.

वाचा- देशातली पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची प्रेरणादायी कहाणी

हा असा प्रकार भारतात मुळीच घडला नसता. अमेरिकेतल्या गुळगुळीत रस्त्यांवरून गॅरीला ३००० किलोमीटर ट्रक हाणता तरी आला. आपल्याकडच्या रस्त्यांमधल्या खड्ड्यांवर ठेचकाळत दोन किलोमीटरमध्ये त्याची नशा उतरली असती!

Story img Loader