Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण सुंदर डान्स करताना दिसतात. अशातच सोशल मीडियावर दोन दिव्यांग चिमुकलींच्या लावणी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन दिव्यांग चिमुकली व्हिलचेअरवर बसून अप्रतिम अशी लावणी सादर करताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. (true art the physically challenged girls in Pune presenting amazing lavani dance video of Fergusson College goes viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन दिव्यांग चिमुकल्या दिसतील. या चिमुकल्या स्टेजवर ‘मदनमंजिरी’ या गाण्यावर अप्रतिम असे लावणी नृत्य सादर करताना दिसत आहेत. त्या व्हिलचेअरवर बसून हे लावणी नृत्य सादर करत आहे. त्या हातवारे आणि बोलक्या सुंदर हावभावातून अप्रतिम अशी लावणी डान्स करतात. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लावणी करताना त्या व्हिलचेअरचा सुद्धा वापर करतात. सध्या हा तुफान व्हायरल होत आहे. मनात इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती अशक्यही शक्य करून दाखवते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे या दिव्यांग मुली.
हा व्हिडीओ विश्व मराठी संमेलनातील आहे. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडले. या समेंलनात हजारो लोकांची उपस्थिती होती. त्या दरम्यान या दोन चिमुकल्यांनी हे लावणी सादर केले होते.
पाहा व्हायरल व्हिडीओ
vishwamarathisammelanofc या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “‘मदनमंजिरी’ या गाण्यावर दोन दिव्यांग चिमुकलींचे सुंदर लावणी नृत्य !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सलाम तुमच्या जिद्दीला अप्रतिम खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “खुप छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम परफॉर्मन्स सिस्टर” अनेक युजर्सना या चिमुकल्यांचा डान्स आवडला. काही युजर्सनी हार्टे इमोजी शेअर करत या चिमुकल्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.