जिथे मन जुळलेली असतात, विचारांची देवाणघेवाण नियमित सुरु असते तशी मैत्री आयुष्यभर पुरून उरते. मैत्री, दोस्ती, यारी, जिगरा… निःस्वार्थी आणि रक्तापलिकडील या नात्याची अशी कित्येक नाव आहेत. सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये कायम सोबत असतात ते म्हणजे आपले मित्र. अशाच दोन मित्रांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमधली दोन मित्रांची ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन मित्र स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून असं दिसतं की मित्र अंध आहे आणि तो आपल्या डोळ्यांनी मॅच पाहू शकत नाही. म्हणून त्याचा मित्र त्याला बाजुला बसून क्षणोक्षणीचे मॅचचे अपडेट्स देताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये कदाचित त्यांची टीम जिंकलेली असते. हा तरुण आपल्या मित्राला सांगतो की आपली टीम जिंकली आहे. मग दोन्ही मित्र उड्या मारत विजयाचा आनंद साजरा करू लागतात. मैत्रीचा हा अनोखा व्हिडीओ तुम्हीही पाहा.

आणखी वाचा : दारूच्या नशेत या व्यक्तीने सायकलसोबत भलतंच केलं कृत्य, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत दोघांमधील बॉंण्डिंग पाहून अनेक जण भावूक होत आहेत. ही अनोखी मैत्री पाहून यूजर्स मैत्रीचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगत आहेत. तसंच ते त्यांच्या मैत्रीचे गुणगाण करताना थकत नाहीत. काही सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या मैत्रीला सलाम करत असे मित्र आपल्या आयुष्यात हवेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : या ‘छोटी दीपिका’ने सोशल मीडियावर घातला धुमाकुळ, एक्स्प्रेशन्स पाहून Ranveer Singh सुद्धा वेडा झाला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अरे बापरे! जंगल सफारी करताना गाडीसमोर चक्क सिंह आला, मग काय झालं ते तुम्हीच बघा

Dipanshu Kabra नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय ती आतापर्यंत या व्हिडीओला ३० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे तीन हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: True friendship viral video best friends social media prp