Viral Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्याच असाच एक व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजोबा पाकिटात प्रेमाने ठेवलेला आजीचा जुना फोटो दाखवत आहे.प्रेमाला वयाचं बंधन नसतं, ते खरंय. या व्हिडीओतून तुम्हाला आजीविषयी असलेलं आजोबांचं अनोखं प्रेम दिसून येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबांची मुलगी सांगते, “माझ्या बाबाजवळ एक खास वस्तू आहे. बाबांजवळ हे पाकिट आहे त्यात बाबांनी त्यांच्या लग्नाच्या वेळीचा आईचा फोटो जपून ठेवला आहे.”
आजोबा हा फोटो मुलीला पाकिटातून काढून देतात. मुलगी हा फोटो हातात घेतल्यानंतर विचारते, “बाबा हा फोटो किती जुना आहे?” तेव्हा आजोबा सांगतात, “१९७७ साली हा फोटो मला देण्यात आला होता. ४६ वर्षांपासून हा फोटो माझ्या पाकिटात आहे.”
त्यानंतर मुलगी तरुण आईचा फोटो दाखवते आणि त्यानंतर कॅमेरा वृद्ध आईकडे वळवते. तेव्हा वृद्ध आजी मिश्किलपणे म्हणते, “नुसता फोटो ठेवून काय फायदा?” तेव्हा आजोबा म्हणतात, “यातच सर्व आलं..हे लक्षात ठेव” मुलगी हसत हसत म्हणते, “तुम्ही भांडू नका.. तुम्ही भांडू नका” खरं प्रेम काय असतं हे तुम्हाला या व्हिओतून समजेल.

हेही वाचा : मुंबई रेल्वेस्थानकावर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून प्रवाशांना हसू आवरेना…

हेही वाचा : आता प्रतीक्षा संपली! मांडीवर बसून गणपतीला जाऊ न देणाऱ्या चिमुकलीचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

sailee.godbole88 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणी प्रेम करावे तर तुमच्या सारखे करावे बाबा. तुम्ही खरंच हिरो आहात. तुमचा हा गोड स्वभाव… ही पिढी खरंच कमाल आहे!”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक जण हा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत. एका युजरने लिहिलेय, “भांडण आहे ते ठिक आहे पण प्रेम किती भारी आहे, हे महत्त्वाचे आहे. ७० वर्षांपासून सांभाळून ठेवलाय. आता अजून काय हवं.” तर एका युजरने लिहिलेय, “तो फोटो पुन्हा बनवून घ्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “स्त्रियांना पुरुषांचे प्रेम कधीच कळत नाही”

Story img Loader