पती-पत्नीचे नाते हे अनमोल असते. हे नाते साता-जन्माचे असते, असेही म्हटले जाते. एकमेकांच्या सुखदु:खाच्या प्रसंगात साथ देत, दोन्ही जण संसाराचा गाडा चालवतात. तुम्ही पत्नीला पतीची सेवा करताना अनेकदा पाहिलं असेल, पण तुम्ही कधी पतीला पत्नीची सेवा करताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये महिला आपल्या पतीची सेवा करताना दिसतात, परंतु सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वृद्ध जोडपे ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध पती आपल्या पत्नीची काळजी घेताना दिसत आहे.आजारपणामुळे पत्नीला स्वतःच्या हाताने जेवण करता येत नाही, तेव्हा पती पत्नीला स्वतःच्या हाताने जेवण भरवतानाचा हा क्षण कॅमेरात कैद झाला आहे. आयुष्यभर प्रत्येक सुखा-दुख:त सोबत राहण्याचं घेतलेलं वचन या आजोबांनी खरं करुन दाखवलं आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video: आधी निमूटपणे मार खाल्ला नंतर घेतला खतरनाक बदला; छळणाऱ्या तरुणाला बकरीनं दिली भयानक शिक्षा
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @r.maini नावाच्या व्यक्तीने त्याच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लग्नाच्या नात्याला सात जन्मांचे नाते असे म्हणतात आणि असा जोडीदार सात जन्मासाठी मिळाला तर आयुष्य सुखी होते, अशी प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून व्यक्त कण्यात येत आहे. तसेच इंटरनेटवर व्हायरल होत असलेला या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.