प्रेम ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी करतो आणि मनापासून करतो. अनेक जण टाईमपास साठी प्रेम करतात पण त्यांची आयुष्यात सुद्धा एक असा टाईम येतो जेव्हा त्यांना सुद्धा खरं प्रेम होतं. प्रेम ही भावनाच अशी आहे की एकदा तरी प्रेमात पडू पहावं. पण म्हणतात न चांगल्या गोष्टींच दु:ख सुद्धा मोठं असतं. तर मंडळी प्रेमाचं सुद्धा काहीसं असंच आहे. मात्र खरं प्रेम तेच असतं जे कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडत नाही. आपल्या आयुष्यात चढ उतार हे येत असतात, या दोन्ही परिस्थितीत आपल्याला कायम साथ देतात तेच खरं प्रेम. भाळणं संपलं की उतरं ते संभाळण, आणि ज्याला सांभाळणं जमलं तोच जिंकला ! हेच खरं करुन दाखवलं आहे सिरजना सुबेदी या महिलेनी. सिरजना सुबेदी आणि बिबेक पंगेनी या दोघांची कहाणी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतंय.
या दोघांचं लव्ह मॅरेज झालं आहे, ६ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सिरजना सुबेदी आणि बिबेक पंगेनी कुटुंबाच्या संमतीनं लग्न केलं. बिबेक हा सिरजनाचा शाळेतील सिनियर होता.लग्नानंतर सुबेदी आणि बिबेक हे दोघे US मध्ये PhD करण्यासाठी शिफ्ट झाले. लग्नानंतरचे नवे दिवस, लग्नाआधी पाहिलेली स्वप्न हे सगळं दोघाही मनापासून जगत होते,
दिवस हळूहळू पुढे जाते होते. एक दिवस अचानक बिबेकच्या डोक्यात कळा येऊ लागल्या. ते दोघे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलला गेले. त्यावेळी बिबेक सुबेदीला म्हणाला होता, ”मला काही नाही होणार, तू काळजी नको करु.” हॉस्पिटलमध्ये अनेक टेस्ट करण्यात आल्या. दुदैवाने MRI च्या रिपोर्टनंतर त्यांच्या आयुष्यात जणू दुख:चा डोंगरच कोसळला.
बिबेकला चौथ्या टप्प्यातील मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. यानंतर बिबेकाला जगविण्यासाठी तिचा संघर्ष सुरु झाला. त्याला आनंद देण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करत होती. या निदानानंतर त्यावर दोन मेजर शस्त्रक्रिया पण करण्यात आल्या. त्याच्या या संकटात सुबेदी खंबीर उभी होती. यमराजाशी तिची लढाई सुरु होती. ती यमराज आणि तिच्या नवऱ्याच्यामध्ये जणू एका भींतीसारखी उभी होती.
हेही वाचा – बाप-लेकाचा दुर्दैवी अंत! रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच ट्रेनने दिली धडक; VIDEO पाहून उडेल थरकाप
ती चोवीस तास फक्त त्याचासोबत होती, त्याला जेवण भरवण्यापासून पुस्तक वाचण्यापर्यंत अगदी सगळ्या गोष्टी ती प्रेमाने करत होती. पण ज्या क्षणी त्याच्या डोक्यावरील केस काढण्याची वेळ आली तेव्हा मात्र ती पुन्हा हादरली. पण ती परत नव्याने उभी राहीली आणि त्याला साथ देण्यासाठी तिने स्वत:चे केस कापून टाकले.
हेही वाचा – निष्काळजीपणा नडला! मोबाईलवर बोलता बोलता टेरेसवरुन खाली पडला तरुण; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
तिला जे काही शक्य होतं ते सर्व ती करत होती. तिच्या या संघर्षाची आणि जिद्दी कहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. इन्स्टाग्रामवरील officialpeopleofindiaandcrzana_subedi या अकाऊंटवर ते व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील त्यांचा भेटण्यापासून कॅन्सरचं निदान झाल्यानंतरचे प्रत्येक क्षण दाखविण्यात आले आहे. जे पाहून आपल्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही. हे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण एका खऱ्या प्रेम करणाऱ्या महिलेची खंबीर साथ पाहून अवाक् होत आहे.