राज्यात दहा महानगरपालिका, जिल्हा परिषदांचे निकाल लागले. तर दुसरीकडे पाच राज्यांतही विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर राज्यांत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांच्या काळात बोगस मतदान हे प्रकार वारंवार घडतात. एकाच मतदारांचे वेगवेगळ्या ठिकाणी नाव, बोगस ओळखपत्र मिळवून मतांसाठी वाट्टेल ते करण्याचे प्रकार हल्ली पाहायला मिळतात. यातच सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो तुम्ही पाहिला असेल. निवडणुकांच्या काळात कृत्रिम बोटे मतदारांना वाटली जात आहेत. ही बोटे लावून मतदार कितीही वेळा मत करू शकतात अशा अनेक अफवा व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर पसरवल्या गेल्या. पण याचे सत्य आता उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही कृत्रिम बोटे लावून कोणतीही व्यक्ती कितीही वेळा बोगस मतदान करू शकते, ही कृत्रिम बोटे निवडणुकांसाठी आणण्यात आली असल्याच्या अनेक अफवांना पेव फुटले होते. काही व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये अमुक एक पक्ष ही कृत्रिम बोटे वाटत असल्याचेही मेसेज फिरत होते. पण या सगळ्याच अफवा आहेत हे आता उघड झाले आहे. हे फोटो इथले नसून जपानचे आहे. इथे राहणारी महिला डॉक्टर ही कृत्रिम बोटे बनवते. ज्यांनी अपघातात आपल्या हाताची बोटे गमावली आहेत त्यांच्यासाठी ती कृत्रिम बोटे बनवते असेही एका इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे. त्यामुळे या फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण दुसरीकडे मात्र अनेकांनी  हे फोटो ट्विट केले आहेत. या वस्तू सहज आयात होऊ शकतात आणि बोगस मतदान होऊ शकते अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.