व्यायाम करून बॉडी बनवणे, तंदुरुस्त राहणे यांसाठी तरुण मंडळी आवडीने व्यायामशाळेत जातात आणि व्यायाम करतात. व्यायामशाळेत जमेल तितकाच व्यायाम करावा, जमेल तेवढेच वजन उचलावे, असे सांगण्यात येते. तरीसुद्धा अनेक जण जोशात येऊन न जमणाऱ्या गोष्टीसुद्धा करायला जातात. अनेकदा उत्साहात येऊन तरुण मंडळी स्वतःवर संकट ओढून घेतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे. त्यात एक तरुण वेटलिफ्टिंग करायला जातो. वेटलिफ्टिंग करताना त्याचा तोल जाऊन, तो क्षणात खाली पडतो आणि त्याच्या डोक्याला दुखापत होते.
व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. एक तरुण वेटलिफ्टिंग करताना दिसतो आहे. तो तरुण व्यायाम करण्यासाठी वेटलिफ्टिंगचा (Weight Lifting) आधार घेतो. वेटलिफ्टिंग करताना अनेकदा सांगितले जाते की, आपल्याला जमेल तितकेच वजन उचलावे. पण, या तरुणाने तसे न करता गरजेपेक्षा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न केला आणि तो क्षणात खाली पडला. तरुण वेटलिफ्टिंग करायला जातो, हातात व्यायामाचे साधन उचलतो, छातीवर ठेवतो आणि हवेत वर उचलतो. पण, या वेटलिफ्टरने वजन उचलल्यानंतर ते त्याला झेपत नाही आणि तो वेटलिफ्टर क्षणात खाली पडतो. या तरुणाचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
हेही वाचा…अन् बाप जिंकला…लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर वडिलांनी ५० व्या वर्षी दिली NEET परीक्षा
व्हिडीओ नक्की बघा :
वेटलिफ्टिंग करताना गेला तोल :
तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, तरुणाला वेटलिफ्टिंग करताना तोल सावरता येत नाही. तसेच वेटलिफ्टिंगचे ते साधन आणि तो तरुण क्षणात जमिनीवर पडतात. सगळ्यात आधी ते साधन खाली पडते आणि त्यानंतर तो तरुण पडतो. त्या साधनाची चाकासारखी एक बाजू तरुणाच्या डोक्यावर आदळते आणि व्हिडीओचा शेवट होतो. गरजेपेक्षा जास्त वजन उचलल्याच्या कारणास्तव तरुणाचा तोल गेला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. अनेकदा घाई-गडबडीत एखादी गोष्ट करून दाखवण्याच्या उत्साहात आपण स्वतःवर संकट ओढवून घेतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @1000waystod1e या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्यायामशाळेत व्यायाम शिकवण्यासाठी प्रशिक्षक असतात. ते अनेकांना व्यायाम कशा पद्धतीने करायचा हे वारंवार सांगत असतात. पण, तरीसुद्धा काही तरुण योग्य पद्धतीने व्यायामाच्या साधनांचा वापर करीत नाहीत आणि व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे अनेक तरुणांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. व्हिडीओ पाहून अनेक जण त्या तरुणाबाबत चिंता व्यक्त करीत आहेत; तर काही जण विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.