सध्या मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तिकीट तपासणी मोहिम जोरदार सुरु आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर चार ते पाच टीटीई कर्मचारी प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी उभे असल्याचे दिसतात. यादरम्यान रेल्वे प्रवासी आणि टीटीईमधील वादाचे प्रसंग घडतात.ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. यात आता मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकांतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावरील टीटी कर्मचाऱ्यांनी एका प्रवाशाला तिकीट नसल्याचे मारहाण करत एका खोलीत डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. कांदिवली रेल्वे स्थानकावर टीटीईंची गुंडगिरीवर आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक रेल्वे प्रवाशांनी आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी संबंधीत टीटीईंविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले आहेत.
कांदिवली रेल्वे स्थानकावर टीटीईंची गुंडगिरी; प्रवाशाला मारहाण करत खोलीत ठेवेल डांबून; पाहा धक्कादायक VIDEO
कांदिवली रेल्वे स्थानकातील हा व्हिडीओ पाहून अनेक रेल्वे प्रवाशांनी आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी संबंधीत टीटीईंविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-02-2024 at 06:15 IST
TOPICSआयआरसीटीसीIRCTCट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoभारतीय रेल्वेIndian Railwayमराठी बातम्याMarathi Newsरेल्वे प्रवासीRailway Passengersव्हायरल व्हिडीओViral Video
+ 3 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tt manhandling passenger allegedly without a ticket at kandivali railway station sjr