बऱ्याचजणांना आपल्या घरामध्ये कुत्रा, मांजरी यांसारखे प्राणी पाळत असतात. घरात कुत्रा पाळणारे लोक सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. ते आपल्या कुत्र्याचे फोटो, व्हिडीओ सतत शेअर करत असतात. सोशल मीडियावर कुत्र्यांचे असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. या माध्यमामध्ये सध्या एका कुत्रीच्या नावाची मोठी चर्चा होत आहे. Tucker Budzyn असे या कुत्रीचे नाव आहे. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिंटेड पेट मेमरीज या पोर्ट्रेट कंपनीच्या संशोधनानुसार, टकर बुडझिन नावाची ही गोल्डन रिटरिवर प्रजातीची कुत्री जागतिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या यादीमध्ये वरच्या स्थानावर आहे. ही अब्जाधीश कुत्री दोन वर्षांची असल्यापासून करोडो रुपये कमावत आहे. जाहिरातींद्वारे टकर बुडझिनची दरवर्षी ८ कोटी रुपयांची कमाई होते. टकरची मालकिण कोर्टनी बुडझिनने न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘एका यूटयूबच्या Paid Ad साठी टकरला दर तीस मिनिटांना ४०,००० ते ६०,००० डॉलर्स मिळतात. तसेच इन्स्टाग्रामच्या ३-८ स्टोरीजमधून टकर २०,००० डॉलर्स कमावते’ असे सांगितले.

कोर्टनी आणि तिचे माइक यांनी नोकरी सोडून आपल्या लाडक्या टकरला संपूर्ण वेळ देण्याचे ठरवले. ते दोघे टकर आणि तिच्या पिल्लाला म्हणजेच टॉडला पूर्णवेळ सांभाळत असतात. कोर्टनीने २०१८ मध्ये जेव्हा टकर फक्त ८ आठवड्यांची होती. तेव्हा तिचे इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केले होते. त्याच वर्षी टकरचे व्हिडीओ व्हायरल व्हायला सुरुवात झाली. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, टकरचे सोशल मीडियावर २५ मिलियन फॉलोवर्स आहेत. टकर बुडझिन या गोल्डन रिटरिवरला टिकटॉकवर ११.१ मिलियन, यूट्यूबवर ५.१ मिलियन, फेसबुकवर ४.३ मिलियन, इन्स्टाग्रामवर ३.४ मिलियन आणि ट्विटरवर ६२,४०० लोक फॉलो करतात. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसह टकरच्या बॅंकेच्या खात्यामध्येही दिवसेनदिवस वाढ होत आहे.

आणखी वाचा – Video: फुटबॉलच्या सामन्यादरम्यान मैदानात घुसला कुत्रा, खेळाडूने दोन्ही हाताने उचललं आणि…

सध्याची तरुण पिढी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सिंग या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहत आहे. फक्त तरुणच नाही तर लहान मुलांपासून वयोवृद्ध मंडळी देखील सोशल मीडियावर कन्टेंट बनवताना दिसतात. हे लोक यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ, फोटोंच्या मार्फत आपला कन्टेंट लोकांपर्यत पोहचवत असतात. कन्टेंट क्रिएशनमुळे यूजर्सची संख्या आणि त्यांचा सोशल मीडिया साईट्सचा वापर वाढल्याने अ‍ॅप्स या लोकांना पैसे देऊ करतात असे म्हटले जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tucker budzyn golden retriever who earns rs 8 crore a year through social media influencing paid ads and viral video know more yps