भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशी मान्यता आहे. तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे. याच तुळशीच्या एका रोपट्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल, हा तर चमत्कार..
तुम्ही आतापर्यंत कधी तुळशीच्या रोपट्याला नाचताना पाहिलंय का? नाही ना, मग हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका झाडाच्या खोडाच्या बाजुलाच एक तुळशीचं रोपटं आहे. तुळसीचं रोप अशा पद्धतीने आपोआप हलत आहे की ती नाचतेच आहे असं वाटतं. तिथं असलेले लोकही हे पाहून हैराण होतात. लोकांचा आवाजही या व्हिडीओत ऐकू येत आहे. कोणी म्हणतंय हवेने तुळस हलतेय तर कोणी म्हणतंय मुंग्या हलवत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – परिश्रम वाया जात नाही, कष्टाशिवाय काहीच मिळत नाही! या चिमणीचा Video पाहून नक्की भारावून जाल..
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे तर, काहींनी याला धार्मिक वळण दिलं आहे. या व्हिडीओलाही हजारो व्ह्यूज गेले आहेत.