प्रेमाची कबुली देण्यासाठी किंवा एखाद्याच्या मनात जागा मिळवण्यासाठी लोक एकापेक्षा एक युक्त्या शोधून काढतात. एखाद्या व्यक्ती आपल्याला आवडते हे सांगण्यालाच flirting असे म्हणतात. कधी एकमेकांना नजरेतूनच इशारा दिला जातो, कोणी गाणे गाऊन, कोणी कविता लिहून तर कोणी महागड्या वस्तू भेट देऊन आपल्या भावना व्यक्त करते. सध्या अशाच एका मजेशीर flirtingची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील एफसी रोडवर घडलेला हा किस्सा एका तरुणीने सांगितला आहे. एका तरुणाने तिला एक चिठ्ठी दिली ज्यात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिठ्ठीत तरुणाने लिहिलेल्या दोन ओळींनी नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

पुण्याच्या तरुणाने हटके पद्धतीने दिली प्रेमाची कबुली

एक्सवर (ट्विटर) @gannergworl नावाच्या अकांउटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एफसी रोड तुम्हाला वेड लावू शकतो. मी रस्त्यावरून जात होते आणि एका व्यक्तीने मला एक चिठ्ठी दिली आणि म्हणाला की, ‘ही तुमची चिठ्ठी खाली पडली होती'” चिठ्ठीत काय लिहिले होते याचा फोटोही शेअर केला आहे. फोटोमध्ये लिहले होते की, “तू पेन्सिल आहेस का? लांबून पाहिल्यावर अप्सरा दिसत आहेस?” (‘तुम पेंसिल हो क्या? दूर से अप्सरा दिख रही हो…’)

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे

हेही वाचा – कुत्र्याने मालकाला बनवले मालामाल! समुद्र किनारी सापडली कोट्यावधीची वस्तू, मच्छिमारचे बदलले नशीब

अप्सरा पेन्सिलचे नाव वापरून केले Flirting

तुम्हाला माहित असेलच की, अप्सरा हे पेन्सिल विकणाऱ्या ब्रँडचे नाव आहे. सुंदर स्त्रीयांचे कौतूक करताना त्यांना अप्सरा असे म्हणतात. तरुणाने अप्सरा पेन्सिलचे नाव वापरून तरुणाने हटके पद्धतीने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान ही पोस्ट वाचून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना तरुणाच्या हिंमत्तीचे आणि प्रयत्नाचे कौतूक केले आहे.

हेही वाचा – छोटीशी ‘आगपेटी’ बनवण्यासाठी करावी एवढी मेहनत! कशी तयार होते ‘काडीपेटी’? पाहा Viral Video

नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

या पोस्टवर अनेकांनी कमेंटस केल्या आहेत. एकाने लिहिले की, “मी ही युक्ती वापरणार आहे.” दुसऱ्याने लिहले की, “किती प्रेमाने लिहिले आहे….स्वीकार करून टाक.” तिसरा गंमतीत म्हणाला, “याचा आनंद घ्या, हे लॅमनिनेट करून हा क्षण आठवण म्हणून जपून ठेवा.”

Story img Loader