पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे एक आनंद सोहळा असतो. उत्सवाचे हे दहा दिवस सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते. पुण्यात नुकताच उत्साहात पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. विसर्जन मिरवणुकींमध्ये ढोलताशा प्रमाणेच डीजे साऊंड लावले जातात आणि बॉलीवूडच्या गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसते. पण तरुणालाही लाजवेल असा एका आजीबाईचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. आजीबाईंचा उत्साह नेटकऱ्यांना प्रंचड आवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाप्पााच्या विसर्जन सोहळा नुकताच मोठया उत्साहात पार पडला असून मिरवणूकीतील एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. कोणी आपल्या घरातच मिरवणुकीच्या गाण्यावर डान्स करत आहे तर कोणी टेरेस किंवा गॅलरी उभे राहून डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोणी आपल्याच अतंरगी पद्धतीने नाचताना दिसत आहे. कुठे ढोल-ताशाच्या गजरावर लोक नाचताना दिसत आहे. दरम्यान एका आजीबाईंनी सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – “पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, पुलाच्या पदपथावर दुचाकी चालणार्‍यांना पुणेरी काकूंनी घडवली अद्दल, पाहा Viral Video

येथे पाहा Viral Video

हेही वाचा – “मूर्तीजवळ उभे राहून स्वत:ला मालक समजू नका, बाप्पा सर्वांचा आहे!”, दर्शन घेणाऱ्या भक्ताला व्यक्तीने मारली लाथ, Video पाहून संतापले नेटकरी

पुणेरी आजीबाईंचा डान्स चर्चेत

व्हायरल व्हिडीओमध्ये ६० ते ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची एक वृद्ध महिला विसर्जन मिरवणुकीत डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे आजीबाई चक्क ट्रॅक्टरवर उभ्या राहून नाचताना दिसत आहे. आजींबाईचा उत्साह तरुणाईला मागे टाकणार आहे. “तुम तो धोखेबाज हो” या बॉलीवूड गाण्यावर आजीबाईंनी भन्नाट डान्स केला आहे जो नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. आयुष्य खुप सुंदर आहे फक्त त्याचा आनंद घेता आला पाहिजे जसा व्हायरल व्हिडीओमधील या आजीबाई घेत आहे.

दरम्यान आजीबाईंचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ शेअर करताना आजीबाईंचे वय ७२ वर्ष असल्याचे सांगितले आहे. निलकंठ मित्र मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकी दरम्यान या आजीबाई नाचताना दिसल्या. निलकंठ मित्र मंडळाने या आजींचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा –“लहान लेकरांना गर्दीमध्ये आणू नका”, पुण्यात बाप्पाच्या दर्शनसाठी भक्तांचा महापूर; गर्दीत चिमुकल्यांचे हाल, Video Viral

नेटकऱ्यांनी केलं कौतूक

व्हायरल व्हिडिओ टिळक चौकातील आहे. आजीबाईंचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत

एकाने कमेंट करत लिहिले,” आजीचा विषय हार्ड आहे”

दुसऱ्याने कमेंट केली, “भारी आजी”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tum to dhokebaaz old lady dance on a tractor in pune ganesh visrjan mirvnuk 2024 video viral snk