Video : सोशल मीडियावर टर्किश आइस्क्रीमचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हायरल व्हिडीओमध्ये टर्किश आइस्क्रीमविक्रेता ग्राहकांबरोबर खूप प्रँक करताना तुम्हीही पाहिले असेल. अनेकदा आइस्क्रीमवाला ग्राहकाला सहज आइसस्क्रीम देत नाही. ग्राहकांची खूप मजा घेतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टर्किश आइस्क्रीमवाला गावच्या माऊलीबरोबर प्रँक करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक मुलगा आणि आई टर्किश आइस्क्रीमच्या गाडीसमोर उभे आहेत आणि आइस्क्रीमवाला गावाकडच्या या माऊलीची मजा घेताना दिसत आहे. आइस्क्रीमवाला माऊलीसमोर आइसस्क्रीम नेतो आणि जेव्हा ती माऊली आइस्क्रीम घ्यायला हात पुढे करते तेव्हा आइस्क्रीमवाला आइस्क्रीम मागे घेतो. व्हिडीओत पुढे दिसेल की, ही माऊलीसुद्धा आइस्क्रीमवाल्याचा प्रँक पाहून गोड हसताना दिसत आहे. या माऊलीचे हसू पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
WATCH Radhika Merchant and Anant Ambani’s fun Turkish ice cream moment in Dubai goes viral
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी फिरत आहेत दुबईत! Turkish आइस्क्रिम खाताना राधिकाचा मजेशीर Video होतोय Viral

हेही वाचा : नव्वदीतील आजीने केला भन्नाट डान्स; “मोनिका, ओह माय डार्लिंग” गाण्यावर दाखवला जलवा

mr.sam420_shelke_ या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आईची स्माईल” हा व्हिडीओ या माऊलीच्या मुलाने शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देताना म्हटलेय, “नशीबवान आहेस मित्रा; सुखी आहेस.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान स्माईल आहे आईची.” आणखी एका युजरने लिहिलेय, तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आईला मिळो.”