ही घटना केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील कल्लर येथील सरकारी कल्याण निम्न प्राथमिक शाळेतील आहे. माधवी या ४७ वर्षीय शिक्षिकेचा फोनवर मुलांना ऑनलाइन शिकवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुलांना शिकवतानाच शिक्षिका अस्वस्थ होऊ लागल्या आणि यानंतर त्या बेशुद्ध पडल्या पुढे काही मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.

शेवटची इच्छा राहिली अपूर्ण

त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी माधवी यांनी एक इच्छा व्यक्त केली जी अपूर्णच राहिली. खरंतर माधवीला तिच्या विद्यार्थ्यांना बघायचं होतं पण ते होऊ शकलं नाही. शिक्षिका माधवी यांचे निधन झाले तेव्हा त्या इयत्ता तिसरीसीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत होत्या. ऑनलाइन क्लास घेत असताना माधवीला अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि खोकला येऊ लागला.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

रुग्णालयात जाण्यापूर्वीच झाला मृत्यू

त्रास वाढत असल्याचे पाहून माधवीने विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला आणि वेळेपूर्वी वर्ग संपवला. काही वेळाने माधवीच्या घरी आलेल्या एका नातेवाईकाने तिला जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेले पाहिले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

(हे ही वाचा: जर जगाची भूक माझ्या संपत्तीनं भागणार असेल तर मी टेस्ला विकायला तयार; एलन मस्क )

रेकॉर्डिंगमध्ये कैद झाल्या आठवणी

शिक्षिकेने तिच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी मुलांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या त्यांच्या ऑनलाइन क्लासच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगत आहे की त्यांना मुलांना बघायचे आहे. त्या म्हणतात की पुढील आठवड्यात शाळा पुन्हा सुरू होतील आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांना पाहता येईल. यानंतर त्यांनी मुलांना स्वतःचा कॅमेरा ऑन करण्यास सांगितले जेणेकरुन त्या मुलांना पाहू शकतील. शिक्षिकेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिच्या अचानक मृत्यूचे कारण उच्च रक्तदाब असू शकते.

Story img Loader