मुंबईत १३ मे रोजी अभूतपूर्व घटना घडली. अचानक मुंबईभर धुळीचं साम्राज्य निर्माण झालं. वादळी वारे वाहू लागले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६० किमी प्रतितास वेगाने हे वारे वाहत होते. याचा परिणाम म्हणून घरावरील छप्पर उडून गेली, झाडे उन्मळून पडली. एवढंच नव्हे तर सर्वांत मोठा होर्डिंगचा खिताब मिरवणारा होर्डिंगही या वाऱ्याच्या झोताने जमीनदोस्त झाला. परिणामी या होर्डिंगच्या खाली गुदमरून तब्बल १४ जणांचा जीव गेला. तर ७५ जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे संचालक आनंद महिंद्रा यांनीही हा व्हीडिओ पोस्ट करत संताप व्यक्त केलाय.
मुंबईत सोमवारी दुपारी ४.१० च्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि काही भागात मुसळधार पाऊसही कोसळू लागला. घाटकोपर परिसरात जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे अनेकजण या पेट्रोल पंप परिसरातील कॅनॉपी खाली उभे होते. तसेच पेट्रोल भरण्यासाठी अनेक वाहने पंपावर आली होती. त्यावेळी अचानक पेट्रोल पंपालगत असलेला १२० बाय १२० चौरस फुटांचा महाकाय लोखंडी जाहिरात फलक पंपावर कोसळला. त्यामुळे वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी भरण्याकरिता आलेले आणि पेट्रोल पंपाच्या कॅनॉपी खाली थांबलेले नागरिक जाहिरात फलक व कॅनॉपीच्या खाली दबले गेले.
हेही वाचा >> घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत जबाबदार असलेले भावेश भिंडे कोण? बेकायदेशीर बोर्डची लिम्का बुकमध्ये का झाली होती नोंद?
याबाबत आनंद महिंद्रा म्हणाले, “जाहिरात फलक कोसळून १४ जणांचा मृत्यू, ६० जण जखमी. ओम शांती! हे अस्वीकार्य आहे. आणि आपण आपल्या शहराला आधुनिक महानगरात रुपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.”
जागा कोणाची यावरून वादंग
दरम्यान, बेकायदा जाहिरात फलक उभा असलेली जागा आणि फलक कोणाचा यावरून वाद सुरू झाला. फलक पडल्यानंतर काही कालावधीत मुंबई महापालिकेने संबंधित जागा महापालिकेची नसल्याचे जाहीर केले. तसेच महापालिकेने मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेकडे बोट दाखविले. तर, हा फलक रेल्वेच्या जमिनीवर नाही. तसेच त्याचा भारतीय रेल्वेशी संबंध नाही, असा दावा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आला आहे. ही जागा रेल्वे पोलिसांची असल्याचे मध्य रेल्वेतील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र आता महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने ही जागा रेल्वे पोलिसांचीच असल्याचा दावा केला आहे. लोहमार्ग पोलीस वसाहतीच्या हद्दीत हे फलक असून महा