Turtle Eats Live Crab Video : वन्यप्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे फारच भीतीदायक आणि धडकी भरवणारे असतात, काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला होतं. लोकांनाही प्राण्यांच्या जीवनासंबंधित व्हिडीओ पाहायला आवडतात. या व्हिडीओमध्ये विशेषत: प्राण्यांच्या लढाईचे आणि शिकारीचे व्हिडीओ अधिक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात चक्क कासवाने एका खेकड्याची शिकार केली आहे. पण, त्याची शिकार करण्याची पद्धत इतकी भयानक आहे की पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
क्षणात जिवंत खेकड्याची केली शिकार
व्हिडीओमध्ये दिसून येते की, एक कासव आपल्या डोळ्याची पापणी लवत नाही तोवर जिवंत खेकड्याला अख्खा गिळतो. आत्तापर्यंत आपण कासवाकडे एक शांतप्रिय प्राणी म्हणून पाहिले. हा प्राणी सहसा वनस्पतींची पाने, फुले, फळे, कीटक, एकपेशीय वनस्पती, स्क्विड, जेलीफिश, मासे इत्यादी गोष्टी खाताना पाहिले आहे. मात्र, व्हिडीओमधील कासवाचे भयानक रूप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कासवाच्या समोरून एक जिंवत खेकडा जात होता. खेकड्याने कल्पना केली नसेल की, पुढच्याच क्षणी तो कोणाचा तरी भक्ष्यक होईल. सुरुवातीला कासव खेकड्याकडे शांतपणे पाहत राहतो, पण खेकडा जसा अगदी तोंडाजवळ येतो, तेव्हा कासव त्याच्यावर झडप टाकतो आणि एका क्षणात त्याला जिवंत गिळतो. अख्खा खेकडा गिळल्यानंतर कासव पूर्णपणे सामान्य स्थितीत येतो. असे दाखवतो, जसे काही घडलेच नाही. कासवाची ही शिकार करण्याची थरारक आणि जबरदस्त पद्धत पाहून युजर्सही शॉक झाले.
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
कासवाच्या शिकारीचा हा थरारक व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये कासव ज्या वेगाने शिकार करत आहे, ते पाहून लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, त्यामुळे अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, त्याने खरंच त्याला खाल्ले का हे पाहण्यासाठी आता मला तो व्हिडीओ पुन्हा पाहायला लागेल.”