लॉकडाऊनसारख्या खडतर परिस्थितीला तोंड दिल्यानंतर सर्वसामान्यांची आर्थिक घडी जी विस्कळीत झाली होती, ती आता हळुहळू सुरळीत होऊ लागली आहे. कितीही मनाविरुद्ध परिस्थिती असली तरी त्यावर मात करणे जमलेच पाहिजे, तरच आयुष्य सुखकर होईल. यासाठी मनावर संतुलन राखणे गरजेचे असेत. हे संतुलन राखलं तर तुम्ही जगाच्या प्रवाहात टिकू शकता. हे गरजेचं नाही की ही शिकवण तुम्हाला एखादा माणूसच देईल, अनेकदा प्राणीही आपल्याला अशा गोष्टी शिकवून जातात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कासवांचा आहे. जे आयुष्यातील सर्वात मोठा धडा देताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तुमहाला जवळपास सात कासव या लाकडाच्या ओंडक्यावर बसून खेळताना दिसून येत आहेत. लाकडाच्या ओंडक्यावर बसून झुलण्याचा आनंद घेत आहेत. पण हा आनंद घेत असताना काही कासवांचं संतुलन बिघडून ओंडक्यावरून रांगताना दिसत आहेत. यात ते पुन्हा पुन्हा खाली घसरत पाण्यात पडत आहेत. तर काही कासवे हे त्यांचा समतोल साधण्यात यशस्वी होत झुलण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. बघता बघता चार कासवे ओंडक्यावरून घसरून खाली पाण्यात पडतात. हे दृश्य पाहण्यास फारच मजेदार आहेत. ही कासवे एखाद्या लहान बाळाप्रमाणे ओंडक्यावर खेळताना दिसत आहेत.
आणखी वाचा : बापरे! चालकाशिवायच धावू लागली रिक्षा; VIRAL VIDEO पाहून लोक आश्चर्यचकित
कासवांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक खूप एन्जॉय करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना मोठी शिकवण देत आहेत. या कासवांप्रमाणेच ज्यांना आयुष्यात संतुलन राखता येतं तेच जगण्याचा आनंद घेऊ शकतात, अशा धडा या व्हायरल व्हिडीओमधून मिळतोय. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर hersey.dahil16 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला.
आणखी वाचा : VIRAL NEWS : सात जणींना डेट केल्यानंतर आता स्वत:च्या कारसोबतच रिलेशनमध्ये आहे ‘हा’ तरुण
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : बाल्कनीतून मोर उडतानाचा VIDEO VIRAL, पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल
या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ४४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच हजारो लोक व्हिडीओवर प्रतिक्रियाही देत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘मी या गेममध्ये जिंकू शकतो.’ आणखी एका युजरने म्हटले की, ‘शेवटची तीन कासवे निन्जा निघाली.’