Silver smuggling: राजस्थानमधील मेवाड परिसरात चांदीची तस्करी जोरात सुरू आहे. चांदीच्या तस्करीच्या तारा गुजरातशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते. मेवाडमधील डुंगरपूर आणि उदयपूर जिल्ह्यात तीन दिवसात सुमारे २६ क्विंटल चांदीचे दागिने आणि अंगठ्या पकडण्यात आल्या आहेत. ही चांदी एका खासगी बसमध्ये नेली जात होती. दोन्ही जिल्ह्यात जप्त केलेल्या चांदीची बाजारभाव कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तीन दिवसात दुसऱ्यांदा एकाच बसमधून चांदीची तस्करी होत असल्याचे लक्षात आले आहे.

डुंगरपूर जिल्ह्यात, बिछीवाडा पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत आग्राहून गुजरातला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमधून १३२१ किलोपेक्षा जास्त किमतीची चांदी पकडली. बसमध्ये तळघर करून ही चांदी भरण्यात आली. पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. मात्र चांदी कोणाची आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. दुसरीकडे, उदयपूरच्या गोवर्धन विलास पोलिसांनी शुक्रवारी कागदपत्रांशिवाय नेल्या जाणाऱ्या १०५ पार्सलमधून सुमारे ४ क्विंटल ५० किलो चांदीचे दागिने आणि सुमारे सात क्विंटल ७२ किलो चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

(हे ही वाचा: …अन् बुट काढून सलमान खानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला केलं अभिवादन; महाराष्ट्रभरात Video चर्चेत)

कुठे लपवली होती चांदी?

डुंगरपूरचे डीएसपी राकेश कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. येथील श्रीनाथ ट्रॅव्हल्सच्या बसमधून ही चांदी जप्त करण्यात आली आहे. ही चांदी बसच्या मागील टायरजवळ एका केबिनमध्ये ठेवण्यात आली होती. केबिनमधून ७० हून अधिक बॉक्स निघाले. त्यात चांदीचे दागिने, मूर्ती आणि इतर अनेक वस्तूंनी भरले होते. मोठ्या प्रमाणात रोकडही होती.

(हे ही वाचा: समुद्रकिनाऱ्यावर धावणारे ‘बेबी डायनासोर’? viral video बघून नेटीझन्स झाले आश्चर्यचकित)

चालकाला देता आले नाही उत्तर

चौकशीत चालक चांदी व रोख रकमेबाबत कोणतेही उत्तर देऊ शकला नाही. यावर पोलिसांनी बस जप्त केली. बसमध्ये सापडलेल्या चांदी आणि रोख रकमेबाबत कोणत्याही प्रवाशाने दावाही केलेला नाही. त्यावर पोलिसांनी सर्व प्रवाशांना इतर बसमधून पाठवले. डीएसपी म्हणाले की, “पोलीस या प्रकरणातील ट्रॅव्हल एजंटसह चांदीच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.”

(हे ही वाचा: पंडितजी बोलवत राहिले आणि वर वाट पाहत राहिला पण वधू…; बघा हा मजेशीर viral video)

१०५ वेगवेगळ्या पार्सलमध्ये भरली होती चांदी

उदयपूरचे गोवर्धन विलास ठाणेाधिकारी चेल सिंह यांनी सांगितले की, शुक्रवारी नाकाबंदीदरम्यान अहमदाबादहून आग्राकडे जाणाऱ्या श्रीनाथ ट्रॅव्हल्सच्या बसची झडती घेतली असता त्यांच्या केबिनमध्ये वेगवेगळ्या वजनाची १०५ पार्सल सापडली. ते उघडले असता ते चांदीच्या दागिन्यांनी भरलेले होते. बस चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कागदपत्रेही मिळाली नाहीत तसेच तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. चौकशीत त्याने हे सामान अहमदाबाद येथून भरल्याचे सांगितले. उदयपूर शहर, नाथद्वारा, जयपूर, आग्रा अशा अनेक ठिकाणी ती दिली जाणार होती. पोलिसांनी सर्व पार्सल जप्त केले आहेत.

(हे ही वाचा: अजब प्रेम कहाणी! विद्यार्थिनी चक्क शिक्षकालाच घेऊन पळाली; म्हणाली, “आता जगणं…”)

एकाच बसमधून दोन्ही वेळा तस्करी

उदयपूरच्या गोवर्धन पोलीस ठाण्याच्या पोलिसांना ६ मे रोजी ज्या बसमध्ये ही चांदी मिळाली त्याच बसमध्ये डुंगरपूरमध्ये चांदी सापडली होती. गोवर्धन पोलीस ठाण्याने चांदी जप्त करून बस सोडली होती. त्यानंतर अवघ्या ४८ तासांनी त्याच बसमधून पुन्हा चांदीची तस्करी सुरू झाली. आग्र्याला गेल्यावर ती पुन्हा बसमध्ये चांदी भरून गुजरातच्या दिशेने घेऊन जात होती. यावेळी पोलिसांनी बसही ताब्यात घेतली आहे.

Story img Loader