भारतामध्ये समाजमाध्यमांसंदर्भातील नवीन नियमांवरुन भारत सरकार आणि ट्विटरवरुन वाद सुरु असतानाच आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टीक हटवल्याने आज या वादात पुन्हा एकदा नवी ठिणगी पडली. मात्र दुसरीकडे आफ्रिकेमधील नायजेरियामध्ये ट्विटरने थेट राष्ट्राध्यक्षांचेच ट्विट डिलीट केल्याने नायजेरियन सरकारने ट्विटरवर अमर्यादित कालावधीसाठी बंदी घातली आहे.

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद्दू बुहारी यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत ट्विटरने त्याच्या हॅण्डलवरील ट्विट डिलीट केलं. त्यानंतर सरकारने शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) ट्विटरवर बंदी घालत असल्याची घोषणा केली. मात्र या साऱ्या गोंधळामध्ये आता नायजेरियामध्ये ट्विटरची जागा घेण्याचा प्रयत्न कू ही भारतीय कंपनी करत आहे. कू कंपनीचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कंपनीला नक्कीच अच्छे दिन येतील असं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> “ट्विटर East India Company सारखं वागू लागलंय, इथूनच पैसा कमावायचा आणि…”; VHP ने व्यक्त केला संताप

कू चे सहसंस्थापक असणाऱ्या अप्रमेय राधाकृष्ण यांनी नायजेरियामध्ये ट्विटरवर बंदी घातल्यानंतर एक ट्विट केलं आहे. “कू आता नायजेरियामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आम्ही तेथील स्थानिक भाषांमध्ये सेवा देण्याचा विचार करत आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?,” असं अप्रमेय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नायजेरियात कू उपलब्ध असल्याचा स्क्रीनशॉर्टही शेअर केलाय.

अनेकांनी यावरुन अप्रमेय यांना सल्ले आणि शुभेच्छाही दिल्यात.

१)

२)

३)

४)

५)

कू ही कंपनी बंगळुरुमधील असून ती पूर्णपणे भारतीय असल्याचं कंपनीचे संस्थापक असणाऱ्या अप्रमेय आणि मयंक बिडावटका यांनी ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. तुम्ही ही मुलाखत येथे क्लिक करुन पाहू शकता.

नायजेरियामध्ये असं काय घडलं की ट्विटरवर बंदी घालण्यात आली?

नायजेरियन सरकारच्या माहिती आणि संस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये, देशातील सरकारने मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साईट असणाऱ्या ट्विटरवर अमर्यादित कालावधीसाठी बंदी घातली आहे, अशी घोषणा केली. यासंदर्भातील वृत्त आफ्रिकन न्यूजने दिलं आहे. बुधवारी ट्विटरने राष्ट्राध्यक्ष मोहम्मद्दू बुहारी यांचं एक ट्विट नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत डिलीट केलं. या ट्विटवर देशातील अनेकांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष युद्ध करण्यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोप केला होता.



काय होतं डिलीट केलेल्या ट्विटमध्ये?

डिलीट केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद्दू बुहारी यांनी ज्यांना सरकार अपयशी व्हावं त्यांच्यासाठी असं म्हणत आपल्या ट्विटमध्ये १९६७ ते १९७० दरम्यान ३० महिने चालेल्या युद्धाचा संदर्भ दिला होता. या माध्यमातून राष्ट्राध्यक्षांनी विरोधकांना इशारा दिल्याची टीका करण्यात आलेली. आज जे बेजबाबदारपणे वागत आहेत त्यांना नायजेरियामध्ये झालेल्या युद्धामध्ये काय घडलं होतं, किती नुकसान झालं होतं याचा अंदाज लावता येणार नाही. आमच्यापैकी अनेकजण त्या ३० महिन्यांच्या युद्धादरम्यान युद्धभूमीवर होते. आम्ही त्या युद्धजन्य परिस्थितीमधून गेलोय. त्यांना (विरोधकांना) समजणाऱ्या भाषेतच उत्तर दिलं जाईल, अशा अर्थाचं ट्विट बुहारी यांनी मंगळवारी रात्री केलं होतं. हेच ट्विट बुधवारी ट्विटरने डिलीट केलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : Twitter वरील Blue Tick इतकं महत्त्वाचं का मानलं जातं?

त्यांची ट्विट डिलीट का नाही करत?

माहिती प्रसारण मंत्री लाई मोहम्मद यांनी हे ट्विट डिलीट करण्यामागे ट्विटरचा अजेंडा असल्याचा आरोप केल्याचं आफ्रिकन न्यूजने म्हटलं आहे. ट्विटरला नायजेरियामध्ये काय करायचं आहे हे खूप संक्षयास्पद आहे. ट्विटरने ननमाडी कानू यांच्याकडून येणारे हिंसक ट्विट का डिलीट केले नाही असा प्रश्न लाई मोहम्मद यांनी उपस्थित केलाय. कानू हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. कानू हे इस्त्रायलमध्ये वास्तव्यास असून नायजेरियाच्या पूर्वेकडील भागाला देश म्हणून स्वतंत्र मान्यता मिळावी यासाठी कानू संघर्ष करत आहेत.

नक्की वाचा >> …अन्यथा परिणामांना तयार राहा!; भारत सरकारचा Twitter ला शेवटचा इशारा

बंडखोरांना पाठिंबा देते ट्विटर कंपनी…

काही काळापूर्वी देशामध्ये आंदोलनाच्या नावाखाली लोक पोलीस स्थानकांना आग लावत होते तेव्हा ट्विटरने हा त्यांचा आंदोलनाचा हक्क असल्याची भूमिका घेतली होती. मात्र असच देशाच्या राजधानीत झालं तेव्हा त्याला बंड असं म्हणण्यात आल्याचा आरोप लाई मोहम्मद यांनी केलाय. बुधवारी राष्ट्राध्यक्षाचं ट्विट डिलीट केल्यानंतर नायजेरियन सरकारने ट्विटरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही अमेरिकन कंपनीची धोरणं ही विरोधाभास असणारी आहेत. कंपनी बंडखोरांना पाठिंबा देते असं नायजेरियाने म्हटलं आहे.

Story img Loader