प्रसिध्द गायक सोनू निगम त्याच्या ट्वीटवरून झालेल्या वादामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. मशिदीमधल्या अजानने आपली झोपमोड होत असल्याचं काहीसं वादग्रस्त ट्वीट केल्यावर देशभर त्याच्या उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. पश्चिम बंगालच्या सईद शाह अल कादरी यांनी सोनू निगमचं मुंडन करणाऱ्याला १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याला प्रत्त्युत्तर म्हणून सोनू निगमने स्वत:च स्वत:चे केस कमी केले. एका ट्वीटमुळे सुरू झालेसा वाद आता मोठं स्वरूप धारण करतो आहे.
आता राष्ट्रीय पातळीवर तयार झालेल्या कुठल्याही गोष्टीचे पडसाद ट्विटरवर उमटतातच. यावेळीही ट्विटरकरांकडून सोनू निगम प्रकरणावर प्रचंड रिअॅक्शन्स येत आहेत. पहा त्यातल्या काही रिअॅक्शन्स.

१) सोनू निगम: केलं मी मुंडन,आणा १० लाख रूपये
अनुपम खेर: अॅक्चुअली ना, मलापण लाऊडस्पीकरचा त्रास होतोय

२) सोनू निगम त्याला मिळालेले १० लाख रूपये त्याच्या ‘शेव्हिंग अकाऊंट’मध्ये टाकणार आहे म्हणे

३. ‘सोनू निगम त्याच्या १० लाखांसाठी वाट पाहतोय तर आम्ही आमच्या १५ लाखांसाठी थांबलोय’

एकूणच हे प्रकरण जाम तापणार असं दिसतंय. ट्विटरवर तर नक्कीच.

Story img Loader